*सेलू (परळी) सेवा सोसायटी  पंकजाताई मुंडेंच्या ताब्यात ; १३ पैकी ११ संचालक विजयी* 



*जनसेवा शेतकरी विकास पॅनलने मारली बाजी ; पंकजाताईंनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन*


परळी  । दिनांक ०२।

   तालुक्यातील सेलू परळी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालील जनसेवा शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे.   पॅनलच्या  १३ पैकी ११ उमेदवारांनी बाजी मारत विजय खेचून आणला. विजयी उमेदवारांचे पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. 

Click&watch:● पंकजा मुंडे-भाजप आणि महादेव जानकरांचं सूचक विधान.

  सेलू परळी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या १३ पैकी ११ जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. दोन संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले असल्याने उर्वरित जागांसाठी मतदान झाले. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा शेतकरी विकास पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलचा पराभव करत सर्व ११ जागांवर दणदणीत विजय मिळवला.  या निवडणुकीत पॅनलचे विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे - संतराम केंद्रे, दत्तात्रय गुट्टे, बालासाहेब घोडके, रामचंद्र फड, रमेश सातपुते, लक्ष्मण सातपुते, हनुमंता सातपुते, भानुदास बचाटे, अश्रुबाई डापकर, भीमाबाई राठोड, विश्वास डापकर


 पॅनलच्या विजयासाठी पॅनल प्रमुख व सरपंच जयवंतराव सातपुते, रवींद्र देशमुख,  तानाजी देशमुख, माजी उपसरपंच गुलाबराव राठोड, सिताराम डापकर, भगवान डापकर, विश्वनाथ राठोड, एकनाथ राठोड, रमेश राठोड, बालासाहेब राठोड आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सर्व विजयी उमेदवारांचे पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार