MB NEWS-बनावट सोने देऊन केली 14 लाखाची फसवणूक; सराफा व्यापाऱ्याला गंडा

 बनावट सोने देऊन केली 14 लाखाची फसवणूक;  सराफा व्यापाऱ्याला गंडा



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
     सिरसाळा येथील एका सराफा व्यापाऱ्याला सोन्या चांदीची खरेदी विक्री करून विश्वासात घेऊन बनावट सोन्याची नाणी देऊन चौदा लाख रुपयाला गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सिरसाळा पोलीस करीत आहेत.
         याबाबत सिरसाळा पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार दिनांक 24 6 2022 रोजी शिवम ज्वेलर्स सिरसाळा येथे फिर्यादी समाधान अशोकराव उबाळे रा. वाघाळा यांच्या सोन्या-चांदीच्या दुकानी आरोपी रामसिंग डांगुर रा. वांगी ता. माजलगाव व अन्य दोन अनोळखी इसम आले. फिर्यादीच्या शिवम ज्वेलर्स या दुकानी जाऊन सोन्या चांदीची खरेदी विक्री करून विश्वास संपादन करून सराफा व्यापाऱ्याला पंधरा नाणी ज्याचे वजन 298 ग्रॅम सोन्याची आहेत म्हणून दिली. फिर्यादीकडे त्याची विक्री करून फिर्यादी कडून 14 लाख रुपये घेऊन निघून गेले. फिर्यादीने या नाण्याची खात्री करण्यासाठी सोन्याचे नाणे गरम करून उकळून खात्री केली असता हि नाणी सोन्याची नसून मिश्रधातूची असल्याचे लक्षात आले. त्यामुळे बनावट सोने देऊन आपली फसवणूक झाल्याची खात्री या व्यापाऱ्याला झाली. फिर्यादीचा विश्वासघात करून 14 लाख रुपयाचा गंडा घालून आर्थिक फसवणूक केली. म्हणून आरोपींविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात कलम 406 420, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनी प्रदीप एकसिंगे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार