MB NEWS- त्या 800 कंत्राटी चालकांना एसटी महामंडळाने शासकीय सेवेत सामील करून घ्यावे - धनंजय मुंडेंची मागणी

 त्या 800 कंत्राटी चालकांना एसटी महामंडळाने शासकीय सेवेत सामील करून घ्यावे - धनंजय मुंडेंची मागणी



*एसटी संप काळात सेवा दिलेल्या 800 कंत्राटी चालकांची सेवा बंद करण्याच्या निर्णयावरून धनंजय मुंडे यांनी केली मागणी*


*कठीण काळात सेवा दिलेल्यांना आता वाऱ्यावर सोडणे योग्य नाही - धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विनंती*


परळी (दि. 05) - एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू रहावी यासाठी बाह्य सांथेमार्फत 800 कंत्राटी चालक नेमले होते,मात्र आता त्या सर्वांना आता काढून टाकण्यात येत असून, या सर्व कंत्राटी चालकांना राज्य शासनाने सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे केली आहे. 


एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात 800 खाजगी चालकांना एसटी महामंडळाने बाह्य संस्थेमार्फत कंत्राटी नेमणूक करून राज्यातील विविध जिल्ह्यात एसटी चालू ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्या सर्व 800 लोकांनी आजतागायत दिवस रात्र सेवा दिली. मात्र त्या सर्वांची सेवा आता बंद करा, अशा स्वरूपाचे आदेश एसटी महामंडळाने आज पारित केले आहेत. 


ज्या लोकांनी एसटी बंद होऊ नये म्हणून दिवसरात्र काम केले आता त्यांना वाऱ्यावर सोडणं योग्य नाही. अचानक रोजगार गेल्याने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबांवर आता उपासमारीची वेळ येऊ शकते. या अन्यायाबाबत काही कंत्राटी चालकांनी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडे निवेदन देखील दिले आहे.


कठीण काळात सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना आता वाऱ्यावर सोडून देणे योग्य नसून त्या सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने नियमित सेवेत सामावून घ्यावे, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका ट्विट द्वारे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार