युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS- *महाराष्ट्र विद्यालयाचा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र*

 *महाराष्ट्र विद्यालयाचा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र*



परळी / प्रतिनिधी


परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालयाचा विद्यार्थी शुद्धोधन अशोक शिंदे हा (एन एम एम एस ) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


ग्रामीण भागातील नामांकित व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य शाळेतील 2  विद्यार्थी एन.एम.एम.एस या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून  

शुद्धोधन अशोक शिंदे हा विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण होत एन एम एम एस राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्तीकरिता तो पात्र ठरला आहे. त्याला केंद्र शासनाची प्रतिवर्ष 12000 याप्रमाणे सलग चार वर्ष एकूण 48 हजार अशी शिष्यवृत्ती मिळणार आहे.तर शाळेची दुसरी विद्यार्थिनी सायली प्रल्हाद राजमाने ही देखील या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाली असून केवळ 2 गुणाने तिचा गुणवत्ता यादीत समावेश न झाल्याने शिष्यवृत्ती मिळण्यापासून वंचीत राहिली.शालेय विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या