MB NEWS-शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- अघाव व मस्कले

  मराठवाडा शिक्षक संघाचा रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 


शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- अघाव व मस्कले 

 परळी वैजेनाथ  :- सर्वांनाच जुनी पेंन्शन योजना लागू करावी, शाळा, वर्ग व तुकड्यांना प्रचलित सुत्रानुसार १००% अनुदान द्यावे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १०,२०,३० अशा तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी,शैक्षणिक संस्थांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनेत्तोर अनुदान द्यावे यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी  मराठवाडा शिक्षक संघाचा रविवार (दि.२) ऑक्टोबर

रोजी सकाळी ठिक ११:३० बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा शिक्षक मतदार संघाचे उमेदवार सुर्यकांत विश्वासराव, माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक पी.एस.घाडगे सरचिटणीस राजकुमार कदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य

मोर्चा काढण्यात येणार आसून या मोर्चास  शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांचा उत्सफुर्तपणे पाठिंबा मिळत आहे. तरी मोर्चास मुख्याध्यापक, शिक्षक-प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य बंडू अघाव व अशोक मस्कले यांच्यासह परवेज देशमुख,विजय गणगे,अनुप कुसूमकर, श्रीहरी दहिफळे, श्रीधर गुट्टे, संजय गोरे, यरकलवाड जी.एम.,अलीशान काजी,ज्ञानोबा गडदे, बालासाहेब जाधव, अघाव बी.टी.,सुर्यभान नागरगोजे, एकनाथ लांडगे, राजाभाऊ राठोड, कांदे डि.एल. लक्ष्मण राऊत, रामलिंग गडदे, गोपीनाथ सोनवणे, अघाव डि.एस.,निला आर.जी.पुंडकरे पी.टी.,बापुराव खोतपाटील, उध्दव गोरे, संभाजी फुलारी, अनंत मुंडे, संजय फड, खान जब्बार यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार