MB NEWS-*गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या गौरी - गणपती स्पर्धा महोत्सवासाठी २हजार ३९१ स्पर्धकाची नोंदणी*

 गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या गौरी - गणपती स्पर्धा महोत्सवासाठी २हजार ३९१ स्पर्धकाची नोंदणी



*पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे घरोघरी जाऊन करणार देखावा, सजावटीची पाहणी*


_तज्ज्ञ महिला परिक्षकांची टीम  स्पर्धा परिक्षणासाठी सज्ज_


परळी । दिनांक ०३।

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि द टर्निंग पॉईंट यांच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या गौरी - गणपती स्पर्धा महोत्सवासाठी सुमारे दोन  हजार ३९१ स्पर्धकांची विक्रमी नोंदणी झाली आहे. येत्या सोमवारी ५ तारखेला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे स्पर्धकांच्या घरोघरी जाऊन देखाव्याची पाहणी करणार आहेत.  तज्ज्ञ महिला परिक्षकांच्या देखरेखीत स्पर्धेचे परीक्षण होणार आहे.


    शहरातील स्थानिक कलाकार व गृहिणींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने हा स्पर्धा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे हया स्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या पण यंदा कोरोनाचे सावट दूर झाले आणि सर्वत्र उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असल्याने हया स्पर्धा देखील मोठया उत्साहाने पार पडत आहेत. 


  या स्पर्धा महोत्सवासाठी २५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान स्पर्धकांची नोंदणी करण्यात  आली होती. पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळत गेला. मागील स्पर्धेच्या तुलनेत यंदा स्पर्धेसाठी दुप्पट नोंदणी झाली. महोत्सवातंर्गत होणाऱ्या महालक्ष्मी देखावा स्पर्धेसाठी १४९० , घरगुती गणेश सजावट ८६० , बाल गणेश मंडळ देखावा २८  आणि १३  स्पर्धकांनी गणेश मिरवणूक देखाव्यासाठी नोंदणी केली आहे.  यावर्षी  नागरिकांमध्ये स्पर्धेविषयी असलेला प्रचंड उत्साह व उत्सुकता पाहून ही संख्या दुप्पट झाली आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्या वतीने स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली असून घरोघरी स्पर्धकांची उत्तमोत्तम देखावा सादर करण्यासाठी चढाओढ लागली आहे.


पंकजाताई, प्रितमताई करणार पाहणी ; तज्ज्ञ परिक्षकांची टीमही सज्ज

-------------------------

पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे ह्या येत्या सोमवारी म्हणजे गौरी विसर्जनादिवशी    स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या घरी जाऊन स्वतः देखाव्याची पाहणी करणार आहेत. सुमारे ९२ तज्ज्ञ महिला परिक्षकांची टीम स्पर्धेच्या परिक्षणासाठी सज्ज झाली असून सोमवारी सकाळी ९ वा. पासून ही टीम प्रत्येक स्पर्धकांच्या घरी जाऊन देखावा व सजावटीची पाहणी करणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाजपा व द टर्निंग पाॅईटचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. दरम्यान, पंकजाताई व प्रितमताई देखावा पाहणीसाठी घरी येणार असल्याने स्पर्धकांचा आनंद अधिक द्विगुणित झाला आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार