इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती निमित्त शनिवारी प्रा. इंद्रजित भालेराव यांचे व्याख्यान

कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती निमित्त शनिवारी प्रा. इंद्रजित भालेराव यांचे व्याख्यान



परळी / प्रतिनिधी
झुंजार स्वातंत्र्य सेनानी,बीड जिल्ह्याचे माजी खासदार,डाव्या चळवळीचे शिलेदार, महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या 14 व्या स्मृतीदिनानिमित्त शनिवारी (दि.१) रोजी परळी तालुक्यातील मोहा येथे ग्रामीण साहित्यीक व शेतकरी कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांचे ग्रामीण भागातील शिक्षणाची सद्यःस्थिती व समाजाची भुमीका या विषयावर व्याख्यान होणार आहे. 

बीड जिल्हयाचे माजी खा.कॉ गंगाधर बुरांडे यांच्या स्मृती निमित्त मागील १४ वर्षा पासुन शेती, पर्यावरण, पाणी, माती, शैक्षणीक, शेतकऱ्यांच्या संबंधी सरकारचे धोरण यासह वंचित, पिडीत व रोजगाराच्या प्रश्नाचा उहापोह करण्यासाठी मोहा येथे व्याख्यानमाला आयोजीत करण्यात येत आहे. कॉ गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाण अंबाजोगाई व महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा च्या वतीने व्याख्यानमालेचे १४ वे पुष्प वाहण्यात येणार आहे.यापूर्वी या व्याख्यानमालेस आपल्या कर्तृत्वाने राज्य नव्हे तर देशभरात ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व या व्यासपीठावर उपस्थित राहिले आहेत.या वेळी या व्याख्यानमालेचे 14 वे  पुष्प गुभण्यासाठी ग्रामीण साहित्यीक व शेतकरी कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांचे ग्रामीण भागातील शिक्षणाची सद्यःस्थिती व समाजाची भुमीका या विषयावर व्याख्यान होणार आहे.या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी विद्यार्थी, सिटु चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल.कराड असणार आहेत. शनिवार (दि.१) सकाळी ११:०० वाजता परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालयात या व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास शेतकरी, शेतमजुर व नागरीकांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाण अंबाजोगाई व महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा च्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!