MB NEWS-सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांच्या पाठपुराव्यास यश

एफ.एम.आकाशवाणी केंद्र अंबाजोगाईसाठी ड्राफ्ट प्लॅन मंजुर एफ.एम.निर्मितीकरिता 9 कोटी 62 लक्ष रूपयाचा निधी

सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांच्या पाठपुराव्यास यश


*परळी वैजनाथ /प्रतिनिधी*

    केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री ना.अनुराग ठाकुर तसेच प्रसारभारतीकडून  उच्चशक्ती दुरदर्शन प्रक्षेपण केंद्र पिंपळा(धा.) ता.अंबाजोगाई येथे एफएम केंद्र निर्मितीसाठी ड्राफ्ट प्लॅन मंजुर करण्यात आला असून त्याकरिता 9 कोटी 62 लक्ष रूपयाच्या प्रस्तावित निधीस मान्यता देण्यात आली आहे.सन 2022 मध्ये भारत देशातील ईतर राज्यांसह महाराष्ट्रातील एकमेव अंबाजोगाई एफ एम केंद्रास मंजुरी मिळाली आहे.

   केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री

ना.अनुराग ठाकुर तसेच माजी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे माजी मंत्री आ.धनंजय मुंडे,खा.डॉ.प्रीतमताई मुंडे,खा.सुप्रियाताई सुळे,खा.पुनमताई महाजन,खा.रजनीताई पाटील व माजी आ.संजयभाऊ दौंड यांच्या माध्यमातून अंबाजोगाई एफ एम केंद्र मंजुरीसाठी प्रयत्न व संबंधित विभागास शिफारस पत्र देण्यात आले होते तसेच सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता.

   अंबेजोगाई तालुक्यातील पिंपळा(धा.) येथे 1991 साली सुरू झालेल्या उच्च शक्ती दुरदर्शन प्रक्षेपण केंद्राच्याद्वारे प्रसारीत होणारे नॅशनल व डी.डी.न्युज चॅनेल भारत सरकारच्या प्रसारण विभागाने बंद केली होती त्यामुळे याठिकाणी पायाभूत सुविधा,जागा तसेच आवश्यक कर्मचारी संख्या उपलब्ध असल्यामुळे आकाशवाणी केंद्राचे एफ एम व लोकल रेडीओ स्टेशन सुरू करून तांत्रिक दृष्टया लागणारे साहित्य उपलब्ध करून द्यावे तसेच अशाप्रकारचे केंद्र सुरू केल्यास स्थानिक कलाकारांच्या प्रतिभेला वाव मिळून हक्काचे व्यासपीठ मिळेल व मराठवाडयातील बीड,लातूर,

परभणी,जिल्हयातील लाखो लोकांना व प्रवाशी पर्यटकांना एफ एम केंद्राद्वारे सादर होणा-या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल याकरिता तातडीने मान्यता देवून आकाशवाणी केंद्राचे एफ एम,तसेच लोकल रेडीओ स्टेशन सुरू करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे व त्यांच्या सहकार्यांच्यावतीने म.गांधी जयंतीनिमित्त 2 अॉक्टो.21रोजी दुरदर्शन उच्चशक्ती प्रक्षेपण केंद्र पिंपळा(धा.) येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते.यामागणीसाठी केलेल्या उपोषणाची दखल घेत मुंबई आकाशवाणी- दुरदर्शन केंद्राचे तत्कालिन अतिरिक्त महासंचालक श्री.राजेश जैन,श्री.नीरज अग्रवाल व पिंपळा(धा.) येथील केंद्राचे उपसंचालक श्री.सदाशिव चापुले यांच्यावतीने तातडीने प्रस्ताव मंजुरीसाठी प्रसारभारती,दिल्ली यांच्याकडे पाठविला होता त्यानुसार बीड जिल्हयातील 91टक्के व 69 कि.मी.परीसरातील नागरिकांना आकाशवाणीद्वारे एेकण्यासाठी अंबाजोगाई एफ एम केंद्र निर्मितीच्या ड्राफ्ट प्लॅनसाठी मंजुरी व निधी देण्यात आल्याबद्दल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री ना.अनुराग ठाकुर,माजी मंत्री श्री.प्रकाश जावडेकर,माजी मंत्री आ.धनंजय मुंडे,खा.डॉ.प्रीतमताई मुंडे,खा.सुप्रियाताई सुळे,खा.पुनमताई महाजन,खा.रजनीताई पाटील,माजी आमदार संजयभाऊ दौंड,मुंबई आकाशवाणी-दुरदर्शन केंद्राचे उपमहासंचालक नंदिणी दुर्गेश,उपसंचालक सदाशिव चापुले यांच्यासह प्रसारभारतीचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंदांचे परळी-अंबाजोगाई व परीसरातील नागरिकांच्यावतीने चेतन सौंदळे व त्यांच्या सहका-यांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत तसेच एफ एम निर्मिती करिता योगदान देणारे अंबाजोगाई येथील श्री.विशाल अकाते,श्री.अविनाश तळणीकर,परळी न.प.चे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,नगरसेवक श्री.चंदुलाल बियाणी,शिवसेना विधानसभा प्रमुख राजाभैय्या पांडे,मनसे पर्यावरण सेनेचे राज्य चिटणीस श्रीकांत पाथरकर,माजी नगरसेवक सोमनाथ निलंगे,रवीन्द्र परदेशी,शिवसेना नेते भोजराज पालीवाल,वैद्यनाथ बँकेचे संचालक,श्री.नारायण सातपुते,परळी रा.काँ.सरचिटणीस अनंत इंगळे,मनसे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर,अॅड.मनजीत सुगरे,चंदूअण्णा हालगे,मकरंद नरवणे,अ.भा.वारकरी मंडळ मराठवाडा विभागाचे अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे,दयानंद चौधरी,उमेश गुप्ता,संतोष पंचाक्षरी,सतीश चौधरी,शिरीष सलगरे,रमेश चौधरी सर,राजेश कांकरिया,संदीप टाक,मनोज मानधणे,मनोज नरवणे,संतोष चौधरी,अनिल मिसाळ,नितीन पिंपळे,प्रकाश कस्तुरे,आत्माराम खंदारकर,बाळू गिरवलकर,महेश घेवारे,विराज धीमधीमे,हारूण शेख,धनंजय गाढवे,सुमीत कलशेट्टे यांच्यासह अनेकांनी एफएम निर्मितीसाठी उपोषणात सहभाग घेऊन सक्रीय पाठिंबा दिला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !