MB NEWS-देवाच्या दारी चोरी: मंदिराची दानपेटी फोडली

 देवाच्या दारी चोरी: मंदिराची दानपेटी फोडली

घाटनांदूर, प्रतिनिधी...   घाटनांदूर येथील श्री लक्ष्मीश्वर महादेव मंदिरात बसवलेली नवी दानपेटी फोडून चोरट्यांनी अंदाजे चार हजार रुपये लंपास केल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.  या प्रकरणी मंगळवारी (दि.१३) अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. 

श्री लक्ष्मीश्वर महादेव मंदीर (महादेव पट्टी) देवस्थानचे अध्यक्ष सुरेश आप्पा चनबस आप्पा शेटे यांनी  चोरीची फिर्याद पोलिसात दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ६ ते ७ सप्टेंबर दरम्यानच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या उत्तर बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मंदिरात नवीन बसवलेली दानपेटी उचकटून त्यांनी पेटी मधील अंदाजे चार हजार रुपये लंपास केले. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराचे पुजारी बाळासाहेब गणपत पुजारी यांना चोरी झाल्याची लक्षात आले. फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पो.ह.  मुंडे पुढील तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार