MB NEWS-'न्यूज मेकर' भाजपा नेत्या पंकजा मुंडे बनल्या 'न्यूज अ‍ॅंकर'


'न्यूज मेकर' भाजपा नेत्या पंकजा मुंडे बनल्या 'न्यूज अ‍ॅंकर'

मुंबई, 1 सप्टेंबर : भाजप नेत्या पंकजा मुंडे या आज अँकरच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या. यानिमित्ताने पंकजा मुंडेंमधील विविध कलांची जनतेला ओळख झाली. न्यूज मेकर पंकजा मुंडेनी आज पत्रकारांना प्रश्न विचारले. आणि पत्रकारांनीही खुलेपणाने त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. आज ठिकठिकाणी दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन सुरू आहे. यादरम्यान पंकजा मुंडेंनी पुणे आणि मुंबईतील पत्रकारांशी संवाद साधला आणि तेथील परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे या बस बाई बसच्या मंचावर दिसल्या होत्या. यावेळीही त्यांनी खुलेपणाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिली. याशिवाय झी मराठीच्या उंच माझा झोका या कार्यक्रमातही त्या दिसून आल्या होत्या. यावेळी त्यांनी सूत्रसंचालन केलं. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे अशा विविध प्लॅटफॉर्मवर सक्रिय झाल्याच्या दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार