MB NEWS-`मुख्यमंत्री साहेब जिवंत आहे तोपर्यंतच माझ्या बापाला वाचवा` एका लेकीचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्री साहेब जिवंत आहे तोपर्यंतच माझ्या बापाला वाचवाएका लेकीचं मुख्यमंत्र्यांना पत्र


बीड : मुलीच्या लग्नासाठी बापाने सावकाराकडून साडे 8 लाख रुपये 4 टक्क्याने घेतले. त्याला 32 लाखाच्या जमिनिचे तात्पुरते खरेदीखत करुन दिले. मात्र सावकाराचे पैसे परत करुनही त्यांने परस्पर फेर ओढत जमिन हडप केली. इकडे लग्नानंतर 10 दिवसातच लेकीलाही परत पाठवले. त्यामुळे जमिनही हडप केली. अन् लग्न होवूनही लेक घरीच असल्याने माझा बाप चिंतेच आहे. तो आत्महत्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना वाचवा आणि आम्हाला आमची जमिन परत मिळून द्या, असं पत्र शेतकऱ्याच्या मुलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुलीने लिहिलं आहे.
              हे धक्कादायक वास्तव मांडणारं पत्र लेकिनं थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. आपल्या कष्टकरी बापाची व्यथा आणि त्याच्यासोबत झालेली पिळवणूकीची हकीकत सांगणारं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. मुलीच्या भावना नेमक्या काय आहेत, हे पत्र वाचल्यानंतर स्पष्ट होतं. पुजा शेखर सावंत (वय 24 वर्षे, रा.कुप्पा, ता.वडवणी. ह.मु. पुनंदगाव ता.माजलगाव जि.बीड) या विवाहित तरुणीने मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिलंय. 


पत्रात काय म्हटलंय?


"माझे शिक्षण सुरु असल्याने आणि नोकरी न लागल्याने आई-वडिलांनी माझे लग्न करण्याचे ठरवलं. लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून घरचेचे नकार देत होते. मात्र त्यानंतर आमच्या गावातील खासगी सावकारनेच स्थळ आणले. अन् मी देतो पैसे करा लग्न. वडिल म्हणाले. मुलगा चांगला आहे. तर पैसे ठीक आहे. सावकाराने आम्हाला 8 लाख 50 हजार दिले. लग्न काही दिवसांवर आलं. सावकराने पैसे चार रुपये टक्क्याने राहुद्या नसता मला दोन एक्कर जमिन नावची करुन द्या. लग्न जवळ आल्याने आमच्या समोर कोणताही पर्याय नव्हता. म्हणून त्यांना आम्ही 2 एक्कर जमीनीचे खरेदी खत तात्पुरते करुन दिले. नंतर माझे लग्न लावून दिलं. लग्न झाल्यानंतर त्यांनी मला 10 दिवसात हाकलून दिले. वडिलांनी सावकाराचे पैसे परत करुनही जमिन परत दिली नाही. माझे लग्न लावून दिले. तरी मी घरीच आहे. त्यामुळे माझे वडिल खूप खचले असून त्यांनी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आम्हीच त्यांना कसा तरी धीर देत आहोत. मात्र आता माझाही संयम तुटतोय. मोठं होवून जगण्यापेक्षा अगोरदरच मेले असते तर आई-वडिलांपुढे एवढे संकट उभे राहिले नसतं. आमचे वडिल जिवंत आहेत तोपर्यंत आमची जमिन आम्हाला परत मिळून द्या" असं पत्र लिहत या तरुणीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार