MB NEWS-ऊसतोड मजूर विठ्ठल दहिफळेची आर्थिक विवंचनेतुन गळफास घेऊन आत्महत्या!

  ऊसतोड मजूर विठ्ठल दहिफळेची आर्थिक विवंचनेतुन गळफास घेऊन आत्महत्या!



तीन लहान मुलांसह कुटुंबं उघड्यावर पडल्याने सर्वत्र हळहळ !


परळी(प्रतिनिधी) परळी तालुक्यातील नंदागौळ येथील ऊसतोड मजूर कुटुंबातील तरुण असलेला विठ्ठल शिवाजी दहिफळे वय 32 वर्ष याने एक मुलगा अंबाजोगाई येथील दवाखान्यात आय सीसु मध्ये तर दुसऱ्या मुलाला गंभीर आजार असल्याने त्यांच्या दवाखान्यासाठी लागणारा खर्च व घरची अत्यंत हलाखीची व गरिबीची परिस्थिती असल्याने सकाळी 10.30 च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली,हे कुटुंब केव्हा राज्यात तर केव्हा पर राज्यात ऊसतोडन्यासाठी जाते व उर्वरित काळात गावात मिळेल तिथे शेतमजुरीचे काम करते,यावर्षी सुद्धा विठ्ठल व त्याची पत्नी सुनीता  लहान मुलांना घेऊन साखर कारखान्याला ऊसतोडण्यास जाणार होते,त्यांना तीन मुल आहेत 1)वरद वय 05 वर्ष 2)रुपाली वय - वर्ष व समर्थ महिने आहेतऊसतोडन्यास जाण्याचा विचार एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मोठा मुलगा वरद वय - 05 वर्ष याला लहानपणापासून गंभीर आजार असल्याने त्याच्या उपचारास नेहमी खर्च येत होता,त्यात समर्थ वय महिने या मुलाला सुद्धा अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आयसीयु मध्ये दाखल केल्याने तसेच घरची परिस्थिती एकदम हलाखीची असल्याने हा सर्व खर्च कसा करायचा या विचाराने विठ्ठल नेहमी चिंतेत असायचा,याच गरिबीला व आर्थिक परिस्थितीला कंटाळून विठ्ठल दहिफळे याने नंदागौळ येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करत स्वतःच आयुष्य संपवल्याने त्याचे कुटुंब उघडे पडल्याने गावसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


दानशूर व्यक्तींनी कुटुंबाला आधार देण्याची गरज!
विठ्ठल दहिफळे मुळात ऊसतोड मजूर व त्यात त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची त्याचबरोबर त्याचा एक महिन्याचा मुलगा अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात आयसीयू मध्ये तर मोठा मुलगा वय वर्ष याला गंभीर आजार असल्याने व पतीचे असे अकाली जाण्याचे विठ्ठलच्या पत्नी सुनितासह कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर निर्माण झाला आहे,या कुटुंबाला अर्थिक मदतीची गरज निर्माण झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !