MB NEWS-महारुद्र गणेश मंडळाचा उपक्रम

 पौळ पिंपरीत  नेत्र तपासणी शिबीर;शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

महारुद्र गणेश मंडळाचा उपक्रम





परळी (प्रतिनिधी)

तालुक्यातील मौजे पौळ पिंपरी येथे भव्य नेत्ररोग तपासणी आणि उपचार शिबीर घेण्यात आले. महारुद्र गणेश मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. शेकडो नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदवत नेत्रतपासणी करून घेतली. रविवार, दि.04 सप्टेंबर रोजी सार्वजनिक मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, गावातील नवयुवक तरुण पुढे येऊन गणेशोत्सव साजरा करतात. या उत्सवाच्या निमित्ताने लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबवणे ही आदर्श गोष्ट आहे. महापुरुषांच्या प्रेरणादायी विचारांना घेऊन आजची पिढी अशीच वाटचाल करत राहील असा विश्वास व्यक्त केला.


गणेशोत्सव 2022 निमित्त आयोजित भव्य नेत्ररोग तपासणी आणि उपचार शिबिराचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ यांच्यासह नेत्ररोग तज्ञ डॉ.विकास सलगर, डॉ. आकाश सलगर, डॉ. अशोक देवकते, योगेश हाके, पत्रकार मिलिंद चोपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महारुद्र गणेश मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार