MB NEWS-संघटीतपणे संघर्ष केला तर बहुजनांच्या समस्यांचे समाधान - अनिल लोणे

 संघटीतपणे संघर्ष केला तर बहुजनांच्या समस्यांचे समाधान - अनिल लोणे



परळी (प्रतिनिधी) 


आज समाजाच्या आणि बहुजन कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या  निर्माण झालेल्या आहेत. सर्वांनी संघटितपणे लढा दिला तरच याचे समाधान होऊ शकते असे प्रतिपादन अधिक्षक अभियंता अनिल लोणे यांनी केले. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे दि १९ रोजी व्हीआयपी रेस्ट हाऊस चेंबरी परळी येथे पदोन्नती व सेवानिवृत्ती  कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

 

अनिल लोणे ,एस.एन.बुक्तारे यांची अधिक्षक अभियंता पदी पदोन्नती झाल्याबदल त्याचा सत्कार तसेच एम. बी. सरवदे (सुरक्षा विभाग ),उपकार्यकारी अभियंता यु जी नरवाडे, वायदांडे हे सेवा निवृत्त झाल्याबदल व राहुलकुमार वाकळे यांना विश्वकर्मा सलग दोन वेळा मिळल्याबदल व परळी औष्णिक विद्युत केंद्राला विशेष कामगिरीबद्दल यावर्षी  जलव्यवस्थापन आणि पर्यावरण व्यवस्थापनातील उत्कृष्टतेबद्दल  दोन राष्ट्रीय पुरस्कार  मिळाले आहेत. या बद्दल कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ के. एस. तुपसागर यांचा संघटन च्या वतीने अभिनंदन करणयात आले 

या सर्वांचा सत्कार करण्यात आला .या वेळी मा.लोणे साहेब व बुक्तारे साहेब ,सरवदे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष बी एल वडमारे हे होते. २०१७ च्या शासन निर्णयानुसार  पदोन्नतीत आरक्षण बंद झालेले आहे याविरोधात लढा उभारावा लागेल असे यावेळी वडमारे म्हणाले. यावेळी त्यांनी सभासद वाढीसाठी  विस्तृत मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र शिंदे यांनी केले उपस्थिना संघटनेचे अध्यक्ष राहूल बनसोडे, जयवर्धन सुर्यवंशी,एस एल. होटकर , संतोष चर्तुरभूज . सचिन पवार, अब्दुल नईम यांनी मार्गदर्शन केले . तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली . या कार्यक्रमास सुरक्षा अधिकारी सुरवसे आबासाहेब गायकवाड .शेख तोहित संघरक्षित मस्के ,मनीष बलखंडे ,यशपाल मुंडे, पत्रकार भगवान साकसमुद्रे, 'एस बी पांचाळ , विजयानंद बावस्कर ,सय्यद अमिर , शरद लांडगे , वैभव गायकवाड ,प्रीतम हनुमंते ,सचिन पवार , तुषार बावस्कर , एस एस गायकवाड, प्रदीप चव्हाण,कोंडीबा घनगाव,मनोज शिरसाट सभासद बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव भागवत देवकर यांनी केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !