MB NEWS-ऑपरेशन थेटरचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या पंकजाताई मुंडेंनी केल्या प्रशासनास सूचना

 ऑपरेशन थेटरचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या पंकजाताई  मुंडेंनी केल्या प्रशासनास सूचना



परळी वैजनाथ

परळी उपजिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थेटरचे नुतनीकरणाचे काम बंद असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना छोट्या मोठ्या शस्त्रक्रियेसाठी खाजगी किंवा आंबेजोगाई येथे जावे लागत आहे. ऑपरेशन थेटरचे काम बंद असल्याचे निदर्शनास आणून देताच पंकजाताई मुंडे यांनी ऑपरेशन थेटरचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या.

Click &watch:भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग चरणी नतमस्तक.

परळी शहरात 100 खाटाची क्षमता असलेले उपजिल्हा रुग्णालय असून या रुग्णालयात शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात. उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. मागील 2 महिन्यापासून ऑपरेशन थेटरचे नुतनीकरनाचे काम सुरू होते. परंतु हे काम सध्या बंद असल्याने छोट्या मोठ्या शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयात किंवा अंबेजोगाई सरकारी दवाखान्यात जावे लागत आहे. यामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक भार पडत आहे. ऑपरेशन थेटरचे काम त्वरित पूर्ण करून घ्यावे यासाठी शनिवार दि 24 सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अरुण गुट्टे यांना निवेदन दिले. 

Click &watch:■ नवीन आष्टी-नगर रेल्वे उद्घाटन | कार्यक्रमातील असा भावूक प्रसंग | प्रत्येकाचे पाणावले डोळे.

भाजयुमो तर्फे रक्तदान शिबिराच्या उद्घाटनासाठी भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. प्रीतमताई मुंडे उपजिल्हा रुग्णालयात आल्या असता अश्विन मोगरकर यांनी ऑपरेशन थेटरचे काम बंद असल्याचे निदर्शनास आणून दिले. पंकजाताई मुंडे यांनी त्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष निळकंठ चाटे, भाजपाचे अश्विन मोगरकर, भाजयुमो चे शहर कोषाध्यक्ष प्रीतेश तोतला, सेलू सोसायटी चेअरमन बाळासाहेब फड उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार