MB NEWS -धर्मापुरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीमेचे आयोजन

 धर्मापुरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीमेचे आयोजन 

धर्मापुरी । प्रतिनिधी


धर्मापुरी येथील प्राचीन भुईकोट किल्ला व केदारेश्वर मंदिर येथे  दि.४ सप्टेंबर रोजी दुर्ग संवर्धन व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

दुर्ग संवर्धन कार्यासाठी देशभरात कार्यरत असलेल्या राजा शिवछत्रपती परिवार व बा रायगड परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मोहिमेत किल्ल्याच्या तटबंदीवरील गवत, मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढले गेलेले अवशेष काढणे, प्लास्टिक कचरा गोळा करणे इत्यादी कामे आणि पुरातन वस्तू व वास्तू जतन करण्यासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे.  बा रायगड परिवार, राजा शिवछत्रपती परिवार बीड व लातूर विभाग, इतिहास संकलन समिती आणि सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनसह नागरिक या मोहिमेस उपस्थित राहणार आहेत.

या मोहिमेत इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे असे आवाहन राजा शिवछत्रपती परिवार व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे करण्यात आले आहे.

टिप्पण्या

  1. 🙏🚩जय जिजाऊ जय शिवराय जय मावळे 🙏🚩 "आसाराम पाटील"
    !!घोडा कौडगावकर!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार