युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य ; रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण आदींचं आयोजन*

 *पंकजाताई मुंडेंच्या उपस्थितीत रविवारी परळीत 'सेवा पंधरवडा' निमित्त विविध उपक्रम* 



*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य ; रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण आदींचं आयोजन*


परळी । दिनांक २२।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा  वाढदिवस संपूर्ण देशभर 'सेवा पंधरवडा' म्हणून साजरा होत असून त्या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक  भाग म्हणून परळीत येत्या रविवारी (ता.२५) भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत  रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहिमेसह विविध  'सेवा उपक्रम' आयोजित साजरा करण्यात आले आहेत.


     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या दरम्यान भाजपच्या वतीने 'सेवा पंधरवडा' राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शहरात भाजपच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सेवा उपक्रमात पंकजाताई मुंडे स्वतः सहभागी होणार आहेत. शनिवारी २४ तारखेला सकाळी ९ वा.भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने उप जिल्हा रूग्णालयात  रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. २५ रोजी सकाळी ९.३० ते ११.३० वा. दरम्यान काळरात्री देवी मंदिर, बौध्दविहार (भीमनगर), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर व मलिकपुरा भागातील दर्ग्याची स्वच्छता पंकजाताई मुंडे हया कार्यकर्त्यांसमवेत करणार आहेत. भीमनगर भागातील  स्मशानभूमीत पंकजाताईंच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण देखील होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्र प्रदर्शनी देखील यावेळी सर्वांसाठी भरविण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठया संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन भाजपच्या वतीनं करण्यात आलं आहे.


*शनिवारी बीडमध्ये स्वच्छता मोहिम*

-----------------

पंकजाताई मुंडे शनिवारी २४ तारखेला बीड शहरात असणार आहेत. 'सेवा पंधरवाडा' अंतर्गत त्यांच्या उपस्थितीत दुपारी १२.३० वा. कंकालेश्वर मंदिर, शहेनशाहवली दर्गा व माळीवेस भागातील बौध्दविहार येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असं आवाहन शहर भाजप शाखेनं केलं आहे. तत्पूर्वी सकाळी ११ वा.  दैनिक लोकप्रभा ने आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यास पंकजाताई उपस्थित राहणार असून दुपारी ३ वा मांजरसुंबा येथे ऊसतोड मुकदम संघटनेच्या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या