MB NEWS-दस-या निमित्त परळीतील पारंपरिक पालखी सोहळा मार्ग त्वरित दुरुस्त करावा-शिवसेनेची मागणी

 दस-या निमित्त  परळीतील पारंपरिक पालखी सोहळा मार्ग त्वरित दुरुस्त करावा-शिवसेनेची मागणी



परळी वै:-

              परळी हे ऐतिहासिक शहर असल्याने, शहरात नवरात्र उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, आणि दसऱ्याच्या दिवशी ऐतिहासिक अशी श्री वैजनाथ पालखी व काळरात्री पालखी पारंपरिक पद्धतीने पारंपरिक मार्गाने मार्गक्रमन करीत असते,पण यावर्षी पालखी मार्ग नादुरुस्त झाल्याने ,भाविकभक्तां याचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे नगर परिषद प्रशासने त्वरित याची दखल घेऊन पालखी मार्ग दुरुस्त करावा, असे निवेदन परळी नगर परिषद प्रशासनाला  शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी शिंदे ,धनंजय गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली,  शिवसेनेचे सचिन स्वामी,बालासाहेब देशमुख, दीपक जोशी,युवासेना शहर प्रमुख गजानन कोकीळ,संजय कदम,नवनाथ सरवदे,रमेश लोखंडे नारायण सुरवसे,सागर बुंदले,वैजनाथ देशमुख, गणेश सरस्वत यांच्या सह असंख्य शिवसैनिक यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार