MB NEWS-_कुलथे यांनी बीड जिल्ह्याचे नाव दिल्लीत झळकावले - संदीप टाक_

 आदर्श शिक्षक शशिकांत कुलथे यांचा  हृद्य सत्कार


कुलथे यांनी बीड जिल्ह्याचे नाव दिल्लीत झळकावले - संदीप टाक

राष्ट्रपतींच्या हस्ते झालेल्या सन्मानाचे संग्रहित छायाचित्र 


परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.12 - बीड जिल्ह्यातील जि.प. प्राथमिक शिक्षक शशिकांत कुलथे यांचा नुकताच देशाच्या राष्ट्रपती महामयीन द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कार देऊन आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला.बीड जिल्ह्यातील जि.प.शाळेच्या शिक्षकाचा हा झालेला गौरव जिल्ह्याची राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा उंचावनारी बाब आहे.


या गौरवाबद्दल परळी येथील पंडित आत्माराम टाक सराफ या पेढीतर्फे कुलथे सरांचा त्यांच्या बीड येथील निवासस्थानी हृद्य सत्कार करण्यात आला.यावेळी पेढीचे संदीप टाक यांसह परळीतील सोनार बांधव रामाकांतराव डहाळे(रि.मेजर),सुरेश टेहरे,संतोष मैड,अशोक डहाळे यांची उपस्थिती होती.शाल,श्रीफळ,फेटा बांधून कुलथे सरांचा छोटेखानी गौरव करण्यात आला.


राष्ट्रपती यांच्या हस्ते झालेला गौरव म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांचा गौरव आहे.

राष्ट्रपती भवनात श्री कुलथे यांनी बीड चे नाव झळकावले.ही बाब केवळ आपल्या सर्वांसाठीच अभिमानास्पद आहे.भविष्यात असे अनेक पुरस्कार आपल्याला भेटण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे यावेळी संदीप टाक म्हणाले.कुलथे सर यांचे शालेय ते पदव्युत्तर शिक्षण हे प्रथम श्रेणीत झालेले आहे.याशिवाय संगीत,गायन, हस्तकला यामध्ये त्यांनी प्राविण्य मिळवलेले असून आजवर साधारण 30 पुरस्काराचे मानकरी आहेत.याशिवाय आकाशवाणी,वृत्तपत्र लेखन यामध्ये त्यांच्या मुलाखतीही प्रकाशित झालेल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !