MB NEWS-ॲड.संजय फुन्ने यांना पितृशोक ; रत्नाकर फुन्ने यांचे निधन

 ॲड.संजय फुन्ने यांना पितृशोक ; रत्नाकर फुन्ने यांचे निधन


परळी (प्रतिनिधी)

परळी येथील प्रसिद्ध विधीज्ञ अँड.संजय फुन्ने यांचे वडील रत्नाकर बाबुराव फुन्ने यांचे आज दि.३० रोजी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७३ वर्षांचे होते. 

       परळी शहरातील शंकर पार्वती नगर येथील रहिवासी तसेच प्रसिद्ध विधीज्ञ अँड.संजय फुन्ने यांचे वडील रत्नाकर फुन्ने आजारी होते.या दरम्यान आज दुपारी 3 वा. त्यांची प्राणज्योत  मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कै.रत्नाकर फुन्ने यांच्यावर आज सायंकाळी 6 वा.परळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

     अतिशय मनमिळाऊ, कुटुंबवत्सल म्हणून ते परिचित होते.त्यांच्या निधनाने फुन्ने कुटुंबाचा आधारवड कोसळला आहे.त्यांचा निधनाने फुन्ने कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !