युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर:परळीतील दोघांचा समावेश

 जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर: परळीतील दोघांचा समावेश



बीड – जिल्हा परिषदेच्या वतीने यावर्षी दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.जिल्ह्यातून अकरा प्राथमिक, दहा माध्यमिक आणि एका विशेष शिक्षकाचा गौरव करण्यात येणार आहे.


बीड जिल्हा परिषदेने यावर्षी सीईओ अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारासाठी निवड समिती गठीत केली होती.या समितीने जिल्ह्यातील अर्ज केलेल्या शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या.



त्यानंतर जिल्ह्यातून या बावीस शिक्षकांची आदर्श शिक्षक म्हणून निवड केली आहे.यामध्ये सय्यद हशमोद्दीन अंबाजोगाई,लाड गोरक्षनाथ आष्टी,उशाबाई ढेरे बीड,गणेश नरके धारूर,भगवान फुंदे गेवराई,धम्मदीपा दरबारे केज,पाचनकर सुनंदा माजलगाव,सौदागर कांदे परळी,अण्णासाहेब खंडागळे पाटोदा,सुभाष सांगळे शिरूर,सुवर्ण सुतार वडवणी यांना प्राथमिक विभागातून तर संजय तांदळे अंबाजोगाई,संजय कोळी आष्टी,रवींद्र देवगावकर बीड,चांदबा वाघमारे धारूर,विष्णू साळुंके गेवराई,रामकृष्ण भारती केज,बाळासाहेब सोनसळे माजलगाव,पठाण इमरान परळी,विजयकुमार साळुंके पाटोदा,राम वाघूम्बरे शिरूर यांना माध्यमिक विभागातून तसेच अमोल शिंदे आष्टी यांची विशेष शिक्षक म्हणून पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या