MB NEWS-परळी आर्य वैश्य युवक मंडळ २०२२ चा पदग्रहण सोहळा

 परळी आर्य वैश्य युवक मंडळ २०२२ चा पदग्रहण सोहळा 

अध्यक्षपदी गोविंद डूबे तर उपाध्यक्षपदी विशाल गडगूळ यांची सर्वानुमते निवड

परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.२० - येथील आर्य वैश्य युवक मंडळ परळी २०२२ चा पदग्रहण सोहळा रविवारी आर्य वैश्य सभागृह येथे मोठ्या संपन्न झाला.प्रतिवर्षी कार्यकारिणीची निवड करण्यात येते,याचाच एक भाग म्हणून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व वासवी माता आणि रंगनाथ महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. 


यावेळी सर्वानुमते गोविंद डुबे यांची युवक मंडळाचे अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून विशाल गडगूळ, कृष्णा श्रीनिवार यांची निवड करण्यात आली.तर सचिवपदी अभिषेक चिद्रेवार तर विशेष सल्लागार म्हणून वैभव झरकर, सहसचिवपदी अजय मालेवार कोषाध्यक्ष पदी योगेश मुक्कावार, कार्याध्यक्षपदी शशिकांत चिद्रेवार व प्रसिध्दी प्रमुख म्हूणून नारायण चौलवार यांची निवड करण्यात आले.

त्यांनतर आर्य वैश्य महासभेच्या राज्य कार्यकारिणीत निवड झाल्याबद्दल संजीव डुबे तर वैभव झरकर यांचा आर्य वैश्य महासभा बीड जिल्ह्याचे सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्य वैश्य समाज अध्यक्ष विकास डुबे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून भगवान डुबे, नागनाथ पारसेवार,वैजनाथ झरकर,प्रभाकर अय्या, सुनील गडगूळ,रमाकांत कौलवार,रामकिशन देवशटवार हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता दिक्कतवार व गजानन रुद्रवार यांनी केले.तर आभार अजय डुबे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार