MB NEWS-जाणुन घ्या- पीएफआय संघटना : का घातली बंदी?

 जाणुन घ्या-  पीएफआय संघटना : का घातली बंदी?


             पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरुद्ध  (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुन्हा धडक कारवाई केली.  एकाच दिवशी संघटनेशी संबंधित १५० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले तर काहींना अटक करण्यात आली. आता केंद्र सरकारने यावर मोठी कारवाई करत बेकायदेशीर संघटना ठरवत  बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
       पाच कारणांसाठी या संघटनेवर केंद्राने बंदी घातली आहे. पीएफआयवर दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा गंभीर आरोपहीआहे. पीएफआयविरोधात भक्कम पुरावे मिळाल्यानंतरच या संस्थेवर ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पीएफआयसह अन्य संघटनाविरोधात गेल्या काही दिवसापासून देशात छापेमारी सुरू आहे.एनआयए, ईडी यासह राज्य पोलीस पथकेही पीएफआयच्या ठिकांणांवर छापेमारी करत आहेत.


     या संघटनांच्या विरोधात पुरावे मिळाल्यानंतरच केंद्रीय गृहमंत्रालयाने ५ वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात केद्रांने अधिसूचनाही जारी केली आहे. पाटणा येथील फुलवारी शरीफ टेरर मॉड्युलमध्ये पीएफआयचे नाव आले आहे. तसेच एका प्राध्यापकाचा हात कापल्याचा आरोपही आहे.

'पीएफआय'वर बंदी का घातली?

पीएफआयवर देशाविरोधात कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पीएफआयचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया आणि इराकशी कनेक्शन असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. देशात वेगवेगळ्या विचार असलेल्या व्यक्ती आणि संस्थाविरोधात हिंसात्मक वृत्ती ठेवणे, अतिरेक्यांसाठी फंड गोळा करणे, देशाच्या घटनात्मक अधिकारांना आव्हान देणे आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणे, असे आरोप पीएफआय विरोधात करण्यात आले आहेत. त्यामुळे या संघटनेवर ५ वर्षासाठी बंदी घालण्यात आल्याचे केंद्राने म्हटले आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार