परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते शाळेचा गौरव

 इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून तालुक्यातून रमाई प्रायमरी स्कूलला जिल्हास्तरीय स्वच्छ शाळा पुरस्कार

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते शाळेचा गौरव

   

परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)

           शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाची शाळेस जिल्हा स्तरावरील तालुक्यातील स्वच्छ शाळा पुरस्कार रमाई प्रायमरी शाळेस नुकताच घोषित करण्यात आला होता. या पुरस्काराचे बुधवारी (दि.१४) बीड येथे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

    जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित जिल्ह्यातील ३८ शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन बीड येथे नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी अजय बहिर, विस्तार अधिकारी तुकाराम पवार, विस्तार अधिकारी ऋषिकेश शेळके, रंगनाथ राऊत आदि उपस्थित होते.  यावेळी रमाई प्रायमरी शाळेचे संचालक मंगेश देशमुख यांच्या सह मुख्याध्यापक, शिक्षक यांना पुरस्कार देवून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळालेल्या शाळांचे अभिनंदन करून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, शाळा व शालेय परिसर स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाने घ्यावी. तसेच, गाव स्वच्छतेची जबाबदारी सामूहिक घ्यावी. यावर्षी कमी गुणांकन मिळालेल्या शाळांनी अधिक प्रयत्न करावेत व पुढील वर्षी सर्व शाळांनी पंचतारांकित शाळांमध्ये समावेश व्हावा, यासाठी निकषपूर्ती करावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्र शासनाच्या वतीने २०१५-१६ पासून स्वच्छ विद्यालय पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. पुरस्कारासाठी ग्रामीण व शहरी भागातील शासकीय (जिल्हा परिषद), अनुदानित, खाजगी शाळा पात्र असून, यासाठी जिल्ह्यातील 3 हजार 685 शाळांपैकी 3 हजार 637 शाळांनी ऑनलाईन नामांकन सादर केले होते. त्यापैकी 2 हजार 870 शाळा पात्र ठरल्या. पैकी  2 हजार 827 शाळांचे शिक्षण विभागाकडून मूल्यांकन करण्यात आले. पिण्याचे पाणी, शौचालय, साबणाने हात धुणे, ऑपरेशन आणि देखभाल, क्षमता बांधणी आणि कोविड 19 तयारी आणि प्रतिसाद हे मूल्यांकनाचे सहा निकष होते. पुरस्कारासाठी राष्ट्रीय पातळीवर 46, राज्य पातळीवर 26 व जिल्हा पातळीवर 38 शाळा पुरस्कारासाठी पात्र ठरल्या. त्यांना बुधवारी सन्मानित करण्यात आले.  रमाई प्रायमरी शाळेने अल्पावधीतच शहरात आपले नाव तयार केले असून शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते बरोबरच सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. मधल्या काळात विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी विज्ञान प्रदर्शन, विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या सर्व गोष्टींची दखल घेत रमाई प्रायमरी शाळेस जिल्हाधिकारी यांनी सन्मानित केले आहे. संस्थेचे अध्यक्ष संजयजी देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख यांनी शाळेय प्रशासनाचे अभिनंदन केले असून याबद्दल संचालक मंगेश देशमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!