MB NEWS-युवानेते धनंजय गित्ते यांचा शिवसेनेत (शिंदे गट) जाहिर प्रवेश

 युवानेते धनंजय गित्ते यांचा शिवसेनेत (शिंदे गट) जाहिर प्रवेश

परळी (प्रतिनीधी)

 परळी तालुक्यात दांडगा जनसंपर्क असलेले सामाजीक कार्यकर्ते युवानेते धनंजय गित्ते यांनी आज शनिवार दि.24 सप्टेंबर रोजी राज्याचे आरोग्य मंत्री ना.तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदेगटात जाहिर प्रवेश केला.गित्ते यांच्या प्रवेशामुळे परळी तालुक्यात शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

 शिवसेना शिंदेगटाच्या वतिने बीड येथे शनिवार दि.24 सप्टेंबर रोजी हिंदु गर्जना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात परळी तालुक्यात साखर कारखान्याच्या माध्यमातुन शेतकरी,ऊसतोड मजुर,कामगारांमध्ये लोकप्रिय असलेले व्यक्तीमत्व व तालुक्यात दांडगा जनसंपर्क असलेले धनंजय गित्ते यांनी उपस्थिती लावत आरोग्य मंत्री ना.तानाजी सावंत,आ.ज्ञानराज चौगुले,माजी मंत्री सुरेशराव नवले,जिल्हाप्रमुख सचिन मुळुक,कुंडलिकराव खांडे आदींच्या उपस्थितीत शिवसेनेचे शिवबंधन बांधले.यावेळी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष ॲड.रामराव माने,विश्वनाथ धोंडिराम राठोड तालुका सचिव,यशोदा लहूदास राठोड महिला आघाडी तालुका प्रमुख,गजानन कोकीळ युवासेना शहर प्रमुख,सुंदर उत्तमराव रवळे उप तालुकाप्रमुख सिरसाळा गट,संपत मधुकर शिंदे विभाग प्रमुख सिरसाळा,दत्ता सुखदेव सोनवणे सर्कल प्रमुख सिरसाळ गण,तुकाराम कोंडीबा काळे सर्कल प्रमुख पिंपरी,विष्णू कारभारी ढेंबरे उप शहर प्रमुख सिरसाळा,महादेव त्र्यंबकराव कुकर शहर संघटक सिरसाळा,कविता उत्तम राठोडलहूदास राठोड,विकास गायकवाड,सचिन ढाकणे आदींची उपस्थिती होती.

@@@@@@@

गित्तेंच्या प्रवेशाने परळीत शिंदेगटाची ताकद वाढली

  युवानेते धनंजय गित्ते यांच्या शिवसेना शिंदेगटातील प्रवेशाने परळी तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली असुन तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक माणसापर्यंत संपर्क असल्याने भविष्यात शिवसेनेचा शिंदे गट परळी तालुक्याच्या राजकिय क्षेत्रात महत्वपुर्ण भुमिका बजावणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार