MB NEWS-पीएफआय चे बीडमधील कार्यालय सील ! जिल्हा अध्यक्षासह अन्य एकजण न्यायालयीन कोठडीत

 पीएफआय चे बीडमधील कार्यालय सील ! जिल्हा अध्यक्षासह अन्य एकजण न्यायालयीन कोठडीत

बीड , :पीएफआय या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर बुधवारी रात्री बीडमधील कार्यालय महसूल विभागाने सील केले. तर बीड शहर पोलिसांनी जिल्हाध्यक्षासह अन्य एकास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.


पीएफआय या संघटनेच्या बीड येथी माजी जिल्हा अध्यक्षास एटीएसने अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बीडमध्ये संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते.

दरम्यान केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी घालताच बीड शहर पोलिस स्टेशनचे रवी सानप व सहकर्यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फिरोज मोमीन व कामरान खान यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले   असता न्यायालयाने त्यांना 3 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.


तर दुसरीकडे बीड शहरातील जुना बाजार भागातील संघटनेचे कार्यालय महसूल विभागाने सील केले. यावेळी तहसीलदार सुहास हजारे यांच्यासह महसूल व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार