MB NEWS-माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान:

 माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान:  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर 





परळी वैजनाथ दि.२८ (प्रतिनिधी)

          महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात नवरात्री निमित्त "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यास विद्यार्थिनींचा मोठा प्रतिसाद मिळाला.

               येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आरोग्य विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य तपासणी शिबीराच्या सुरुवातीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तर शिबीराचे उद्घाटन संस्थेच्या संचालिका डॉ. मिनल लोहिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे, संस्थेच्या संचालिका छायाताई देशमुख, प्रा.डॉ. विद्याताई देशमुख, प्रा.स्नेहा देशमुख, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे, डॉ संदिप घुगे, डॉ. राजमाने, डॉ सविता मुंडे, डॉ प्रियंका डोळे, डॉ. घुबडे, डॉ बालाजी फड, विष्णू मुंडे उपस्थित होते. डॉ. मिनल लोहिया, डॉ लक्ष्मण मोरे यांनी मनोगते व्यक्त केले. डॉ लोहिया यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की, मुलींसाठी सातत्याने आरोग्य शिबिरे आयोजित करणे आवश्यक आहे. तर डॉ. मोरे यांनी सांगितले की, माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. तालुक्यात हे अभियान पुर्णपणे यशस्वी करणार आहे. याची सुरुवात महिला महाविद्यालयातून झाली असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविक प्रा.डॉ. विनोद जगतकर यांनी तर सुत्रसंचालन प्रा.प्रविण फुटके यांनी केले. कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, महालँबचे तंत्रज्ञ, विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जवळपास २०० विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी व टेस्ट करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !