MB NEWS-लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

 लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा




परळी वैजनाथ दि.०६ 

           येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शिक्षक दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

         राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक परिसरात असलेल्या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मंगळवारी (ता.०६) शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे, प्रा.डॉ विनोद जगतकर, प्रा.डॉ. प्रविण दिग्रसकर यांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.मान्यवरांच्या सत्कारानंतर महाविद्यालयातील श्रावणी साबणे, नंदिनी जाधव, राजर्षी गुट्टे, अश्विनी दराडे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्ते प्रा.डॉ जगतकर यांनी सांगितले की, भारतात अगदी प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे. जर्मनीचा हिटलर हुकूमशाहा असतानाही आपल्या शिक्षकांना मान देत होता. तर जपानमध्येही शिक्षकांचा सन्मान केला जातो. तर प्रा.डॉ दिग्रसकर यांनी सांगितले की, आँनलाईन शिक्षणापेक्षा आँफलाईन शिक्षणात शिक्षकांचे महत्त्व आहे. यानंतर अध्यक्षीय समारोप संजय देशमुख यांनी केला.श्री.देशमुख यांनी यावेळी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.फुटके, सूत्रसंचालन सपना भुसे हिने तर आभार नंदिनी जाधव हिने मानले, कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !