युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-१७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २२ दिवसांच्या सुट्टया: दिवाळी सुटयांचे परिपत्रक जारी

 १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २२ दिवसांच्या सुट्टया: दिवाळी सुटयांचे परिपत्रक जारी



             शासन परिपत्रकानुसार बीड जिल्हयातील सर्व जिल्हा परिषदेच्या, खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील दिवाळी सुटी  जाहीर करण्यात आल्या आहेत. १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २२ दिवसांच्या सुट्टया देण्यात आल्या आहेत.सन 2022-23 या वर्षातील दिवाळीच्या सुटयांबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.
           संदर्भ 1. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे परिपत्रक दि. 11/04/2022 2. ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्र.ZPA-2022/प्रक्र - 21/परा-1या संदर्भिय शासन परिपत्रकानुसार बीड जिल्हयातील सर्व जिल्हा परिषदेच्या, खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील दिवाळी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.दिवाळी सुट्टी - दि. 17/10/2022 ते दि.07/11/2022 (22 दिवस) आहेत. दि. 08/11/ 2022 रोजी गुरूनानक जयंती असल्याने सुट्टी आहे.त्यामुळे दि. 09/11/2022 रोजी पासून शाळा नियमितपणे सुरू होतील.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या