MB NEWS-_सनसनिखेज बातम्यांतून आपल्यापर्यंत एकच ओळ आली:जमले तर संपूर्ण ऐका मग मतितार्थ कळेल !

माध्यमांमधील बहुचर्चित 'त्या' विधानावर पंकजा मुंडेंची उद्विग्न प्रतिक्रिया

सनसनिखेज बातम्यांतून आपल्यापर्यंत एकच ओळ आली:जमले तर संपूर्ण ऐका मग मतितार्थ कळेल !

परळी वैजनाथ,...
       भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या अंबाजोगाई येथे झालेल्या एका भाषणातील वंशवादावरील मुद्दा व 'मोदी मला संपवू शकणार नाहीत' अशा प्रकारच्या एका विधानावरून प्रसार माध्यमात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहेत. यावरून क्रिया -प्रतिक्रिया उमटत असताना याबाबत संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करत आपल्या भाषणातील केवळ अर्धवट एक ओळच वापरून विनाकारण नकारात्मक अर्थ पसरविला जात आहे. असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. हा सणसणीखेज बातम्या चालविण्याचा प्रकार असून संपूर्ण भाषण ऐका मगच मतीतार्थ कळेल अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
         पंकजा मुंडे यांनी अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिजीवी संमेलन कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत 'मोदी मला संपवू शकत नाहीत' असे वक्तव्य केल्याच्या मोठ्या प्रमाणावर बातम्या सध्या चर्चेत आहेत. मात्र पंकजा मुंडेंच्या  या भाषणात  येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचलित जात, पात, पैसा या मार्गांऐवजी जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्या करीता नविन पद्धतीचे राजकारण करुया असे आवाहन केले असल्याचे दिसते.याच संदर्भाने उपस्थित पालक,विद्यार्थी व कार्यकर्त्यांना येणाऱ्या पिढीला चांगल्या राजकीय संस्कृतीची  गरज असल्याचे सांगत असताना मोदींचा उल्लेख हा सकारात्मक अंगाने केलेला दिसतो. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वतःच्या कर्तृत्वातून एवढे उत्तुंग कसे घडले याचे प्रेरक उदाहरणे त्यांनी या भाषणात दिल्याचे दिसते. यात मोदींबद्दल कुठलेही नकारात्मक, आव्हानात्मक अर्थाने वक्तव्य नाही तर पंतप्रधान मोदींचा उल्लेख सर्वश्रेष्ठ - रणधुरंधर राजकीय नेतृत्व या पद्धतीने केलेला आहे. या मुद्द्यांच्याच अनुषंगाने “चांगले काम केले तर मोदीजी सुद्धा पराभव करु शकणार नाहीत “ या मागे हा सकारात्मक संदर्भ आहे. असे असतानाही या भाषणातील एकच ओळ घेत विनाकारण नकारात्मक संदेश पसरविला जात असल्याचे बोलले जात आहे.

      याबाबत उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असताना पंकजा मुंडे यांनी यावर आता आपली प्रतिक्रिया ट्विटर व अन्य सोशल माध्यमातून व्यक्त केली आहे. त्यांनी या कार्यक्रमातील आपल्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ पोस्ट केला आहे.


अशी आहे पंकजा मुंडेंची पोस्ट.....

     "मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर पासून विविध कार्यक्रम केले,त्यात बुद्धिजीवी संमेलन मधील माझ्या भाषणाच्या हायलाईटस्.आपल्या पर्यंत एक ओळ आलीच आहे,"सनसनीखेज" बातम्यातून जमले तर हेही पहा,मतितार्थ लक्षात येईल.पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या लिंंवर आहेच.धन्यवाद."

संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ पहा:

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार