MB NEWS-गौरी-गणपती स्पर्धा महोत्सवाचे बक्षिस वितरण २७ सप्टेंबरला* *पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांची उपस्थिती ; स्पर्धकांनी मोठया संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन*


*गौरी-गणपती स्पर्धा महोत्सवाचे बक्षिस वितरण २७ सप्टेंबरला*



*पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांची उपस्थिती ;  स्पर्धकांनी मोठया संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन*


परळी ।दिनांक २३।

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व द टर्निंग पाॅईट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गौरी-गणपती स्पर्धा महोत्सवातील विजेत्या स्पर्धकांना येत्या २७ सप्टेंबर रोजी एका भव्य कार्यक्रमात बक्षिसं वितरित करण्यात येणार आहेत.  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यावेळी उपस्थित राहणार आहेत. 


    २७ तारखेला दुपारी ४.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अक्षता मंगल कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. 

शहरातील स्थानिक कलाकार व गृहिणींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने हा स्पर्धा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यासाठी २५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान २ हजारांहून अधिक स्पर्धकांची  नोंदणी झाली होती. स्पर्धा महोत्सवा अंतर्गत बाल गणेश मंडळ, घरगुती गणेश सजावट, महालक्ष्मी मखर सजावट आणि देखावा, मंगलमूर्ती मिरवणूक देखावा या स्पर्धा मोठया उत्साहात पार पडल्या. महालक्ष्मी देखावा स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस  डबल डोअर फ्रिज, द्वितीय मायक्रोवेव्ह, तृतीय स्मार्ट फोन तर दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना टोस्टर, बाल गणेश मंडळ स्पर्धेसाठी प्रथम- नऊ हजार रुपये, द्वितीय सात हजार व तृतीय चार हजार रुपये तर उत्तेजनार्थ दोन हजार रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे तर घरगुती गणेश सजावट आणि मंगलमुर्ती मिरवणूक देखावा स्पर्धेसाठी प्रथम ११ हजार, द्वितीय ९ हजार, तृतीय ५ हजार व उत्तेजनार्थ ३ हजार रूपये बक्षिसं दिली जाणार आहेत.  सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू दिली जाणार आहे.  

Click &watch:■ नवीन आष्टी-नगर रेल्वे उद्घाटन | कार्यक्रमातील असा भावूक प्रसंग | प्रत्येकाचे पाणावले डोळे.

*एकाहून एक सरस देखावे ; पंकजाताई, प्रितमताईंच्या भेटीने स्पर्धकांचा आनंद द्विगुणित*

-------------

या स्पर्धेसाठी स्पर्धकांचा पहिल्या दिवसापासूनच मोठा उत्साह होता. सामाजिक जनजागृती, देशभक्तीपर असे विविधांगी एकाहून एक सरस देखावे स्पर्धकांनी तयार करून आपले कलागुण देखाव्याच्या माध्यमातून सादर केले. पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे या दोघीनींही घरोघरी भेटी देऊन स्पर्धकांचा आनंद अधिक द्विगुणित केला. सर्व स्पर्धेचे परीक्षण तज्ज्ञ परिक्षकांमार्फत करण्यात आले होते.यातील विजेत्यांना या कार्यक्रमात बक्षिसं दिली जाणार आहे. यावेळी स्पर्धक, नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार