परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-परळीची सांस्कृतिक चळवळ जोपासण्याचे काम फुलचंद कराड मनापासून करीत आहेत - तेजश्री प्रधान

 परळीची सांस्कृतिक चळवळ जोपासण्याचे काम फुलचंद कराड मनापासून करीत आहेत - तेजश्री प्रधान



परळी/ प्रतिनिधी- महाराष्ट्राला मोठे सांस्कृतिक वैभव मिळालेले असून अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अशा संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत आमच्या कले सोबत परळीची सांस्कृतिकता जोपासण्याचे काम त्यांनी केले आहे असे मत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी व्यक्त केले. दरम्यान नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण हाती घेतलेले हे काम यापुढेही अखंडपणे चालूच राहील असा विश्वास संत भगवान बाबा दुर्गोत्सव समितीचे अध्यक्ष तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी व्यक्त केला.


 श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित दुर्गोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी तेजश्री प्रधान व फुलचंद कराड कार्यक्रमाच्या प्रारंभी बोलत होते. प्रारंभी दोघांच्या हस्ते दुर्गा देवीची  पूजा करण्यात आली.

अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मनोरंजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अभिनेत्री अर्चना सावंत तसेच भाजपा शहराध्यक्ष जुगल किशोर लोहिया नगरसेवक प्राध्यापक पवन मुंडे, मारोतराव आंधळे, प्रदीप आंधळे, डॉ.रुपाली सोनवणे, पा टलोबा मुंडे, नर्सिंग शिरसाट, देऊ कराड, बाबू राठोड, काशिनाथ राठोड, प्रशांत कराड, यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. 


आपल्या भाषणात अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी चांगले कार्यक्रम आयोजित करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. दरम्यान फुलचंद कराड हे मुलींच्या शिक्षणाबाबत खूप आग्रही असतात आणि त्यांनी आपल्या सर्व मुलींना शिक्षण दिले हे कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या. फुलचंद कराड म्हणजे साखर कारखानदार आणि दुधाचा व्यवसाय करणारे व्यक्तिमत्व आहे अशा व्यक्तिमत्त्वाला आपण जर दुग्ध शर्करा योग असलेले व्यक्तिमत्व म्हटले ते वावगे ठरणार नाही या शब्दात अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी कराड यांच्या सहकार क्षेत्रातील कामाचा गौरव केला.आपल्या भाषणात फुलचंद कराड यांनी सांगितले की मी आहे तेथेच आहे, मला श्री सेवा करायची आहे, आपल्या आशीर्वादत तोपर्यंत असेच कार्यक्रम आयोजित केले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आज महाराष्ट्राची लोकधारा लावणीचा कार्यक्रम होत असून ही लावणी महाराष्ट्राची कला आहे असे सांगत त्यांनी आज सहभागी झालेल्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या. राजकारणापेक्षा समाजकारणावर आपला अधिक भर असून यापुढेही तुम्हाला अत्यंत दर्जेदार कार्यक्रम मिळतील असं ते म्हणाले. या नंतर  अर्चना सावंत प्रस्तुत लावणीचा कार्यक्रम पार पडला.या रावजी बसा भाऊजी या गाण्याने तर कहरच केला यासोबतच अनेक लावण्यांनी आजचा कार्यक्रम आणि ढोलकीच्या तालावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकवर्ग  मंत्रमुग्ध झाला होता.  कैरी पाडाची तसेच प्रसिद्ध असलेल्या अनेक हिंदी गीतांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. नृत्य आणि आवाजातील मंत्रमुग्धता हे आजच्या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणता येईल. पहिल्याच कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असून यापुढेही रसिकांची मोठी करून होणार हे निश्चित. कार्यक्रमाचे संचालन शिंदे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!