MB NEWS-शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यसरकार कर्णबधिर झाले आहे - अजय मुंडे

 शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यसरकार कर्णबधिर झाले आहे - अजय मुंडे



_आ. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात प्रथमच सोयाबीन या पिकास 25% अग्रीम विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली होती - अजय मुंडेंनी करून दिली आठवण !_


बीड...प्रतिनिधी ता.14) बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अग्रीम पीकविमा, अनुदान, जनावरांच्या लम्पी आजारावर मुबलक लशींची उपलब्धी आदी विषयांवर आज बीड येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत युवक नेते श्री. अजय मुंडे यांनी सहभाग घेत मांडले. या बैठकीस भारतीय जनता पक्ष सोडून अन्य जवळपास सर्वच पक्षांचे व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 


बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री आ. धनंजयजी मुंडे साहेब असताना, बीड जिल्ह्यात प्रथमच सोयाबीन या पिकास 25% अग्रीम विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली होती, अशी आठवणही या सर्वपक्षीय बैठकीत श्री. मुंडेंनी करून दिली. आज त्याच धर्तीवर जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळांमध्ये सोयाबीनसह विमा संरक्षित असलेल्या सर्वच पिकांना अग्रीम विमा मिळावा, ही प्रमुख मागणी आहे, असेही श्री. मुंडे म्हणाले.


शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कर्णबधिर झालेल्या सरकारला शेतकऱ्यांच्या आक्रोशाची जन आंदोलनाच्या माध्यमातून जाणीव करून देण्याचे आजच्या बैठकीत नियोजन करण्यात आले आहे असेही अजय मुंडे यांनी ठणकावून सांगितले. माजी मंत्री आ. धनंजयजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वात येत्या 16 सप्टेंबर रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीकविमा, अनुदान व अन्य विषयी सर्वपक्षीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले असून, या आंदोलनात सर्व पक्षीय नेत्यांनी व शेतकरी पुत्रांनी संमिलीत व्हावे, असे आवाहनही यावेळी युवक नेते श्री. अजय मुंडे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार