MB NEWS-ग्रामसेवकाचे हात बरबटले; लाच घेताना रंगेहाथ पकडले

 ग्रामसेवकाचे हात बरबटले; लाच घेताना रंगेहाथ पकडले

अंबाजोगाई - सार्वजनिक शौचालयाच्या कामाचे बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना धावडी (ता. अंबाजोगाई) येथील ग्रामसेवक अशोक विठ्ठलराव पुजारी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अंबाजोगाई पंचायत समिती कार्यालयात मंगळवारी (दि.१३) दुपारी ही कारवाई करण्यात आली. 


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत धावडी येथील सार्वजनिक शौचालयाचे काम करण्यात आले होते. या कामाचे बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून ग्रामसेवक अशोक पुजारी (रा. ह.मु. हनुमान मळा, अंबाजोगाई, मूळ रा. तेर जि. उस्मानाबाद) याने कंत्राटदाराकडे १० हजार दुपायांची मागणी केली होती. याबाबत कंत्राटदाराने बीड एसीबीकडे तक्रार केली होती. पडताळणी दरम्यान तडजोडीअंती पुजारी याने ८ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर बीड एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी अंबाजोगाई पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला होता. पुजारी याने कंत्राटदाराकडून लाचेपोटी ८ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने झडप मारून त्यास रंगेहाथ पकडले. याप्रकरणी ग्रामसेवक अशोक पुजारी याच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अपर अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे, कर्मचारी सुरेश सांगळे, हनुमंत मोरे आदी यांनी पार पाडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!