MB NEWS-आसुबाई विद्यालयात कायद्याचे मार्गदर्शन

 *■आसुबाई विद्यालयात कायद्याचे मार्गदर्शन


परळी / प्रतिनिधी


महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहाचे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी माजी खा.कॉ.गंगाधरआप्पा बुरांडे स्मृतीनिमित्त परळी तालुक्यातील मांडेखेल येथील आसूबाई माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे परळी ग्रामीण पोलिसांनी कायद्याचे मार्गदर्शन केले.


बुधवार दि 21 रोजी मांडेखेल येथे महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा व कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान यांच्यावतीने महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित आसूबाई माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिस्तीची जाणीव व्हावी,कायद्याचे ज्ञान व्हावे या उद्देशाने व्याख्यानाचे आयोजन


करण्यात आले होते.या व्याख्यानासाठी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र केकान हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक कॉ.मुरलीधर नागरगोजे कॉ.अशोक भाऊ नागरगोजे मुख्याध्यापक सुभाष हरदास व सर्व कर्मचारी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना पोउपनि झांबरे यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिस्त व तसेच विद्यार्थ्यांची भविष्यातील वाटचाल, मुलींना शाळेत येणाऱ्या समस्या व दामिनी पथकाची जाणीव यावर मार्गदर्शन केले.याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार