MB NEWS- श्री.क्षेत्र माहुरगडी संगीतसेवा: सौ.संगीता चौधरी -कुलकर्णी यांच्या भक्ती संगीत कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध

 श्री.क्षेत्र माहुरगडी संगीतसेवा: सौ.संगीता चौधरी -कुलकर्णी यांच्या भक्ती संगीत कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध



 श्री.क्षेत्र माहूरगड: श्री.रेणुका देवी संस्थान श्री.क्षेत्र माहूरगड येथे शारदीय नवरात्रामधे द्वितीयेला मंगळवारी दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी.सौ.संगीता चौधरी- कुलकर्णी यांच्या भक्तीसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी त्यांनी विष्णुदासांची पदे सादर करुन रसिकांना मंत्र मुग्ध केले.यावेळी त्यांनी गजर,गोंधळ तसेच कानडी भाषेतील भाग्यादा लक्ष्मी बारम्मा, पाहुणी आली घरा,माहूरगडची अंबा,माय भवानी तुझे लेकरु  अशा अनेक भक्तीगीतांनी वातावरण मंगलमय झाले. गाण्याच्या पूर्वी विष्णुदासांचे श्लोक सादर करुन विष्णुदासांप्रति असलेली आपली श्रध्दा प्रकट केली.

       कोरोना महामारीमध्ये देखील त्यांनी विष्णुदासांच्या रचना ध्वनिमुद्रित करुन संस्थानाला पाठवत आपली सेवा  निष्काम अर्पण केली होती. या वर्षीच्या भक्तीसंगीत कार्यक्रमात सहगायनाची उत्तम साथ त्यांच्या मातोश्री अनुराधा चौधरी व डॉ.सौ.सुनिता देशपांडे यांनी दिली.त्यांना तबलाःश्री.प्रशांत गाजरे,संवादिनीःश्री.मंगेश जवळेकर ,पखवाज ःश्री.विश्वेश्वर जोशी तर तालवाद्यांची सुरेल साथ श्री.गिरीश देशमुख यांनी दिली. या कार्यक्रमाचे निवेदन  ओघवत्या शैलीमधे सौ.स्वाती देशपांडे यांनी केले. यावेळी संस्थानाचे विश्वस्त, चंद्रकांत भोपी,केदारे गुरुजी यांनी सहभागी कलाकारांचे स्वागत करुन आई रेणुकेचा प्रसाद दिला. संस्थेच्या विश्वस्तांनी सर्वांचे आभार मानुन प्रतिवर्षी आपली सेवा सादर करण्याचे आवाहन केले.

                        Video 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार