MB NEWS-शिक्षकदिनी पंकजाताई मुंडेंचे गुरूंना वंदन

शिक्षकदिनी पंकजाताई मुंडेंचे गुरूंना वंदन


कवडे गुरूजींच्या निवासस्थानी जाऊन हृदय सत्कार करत घेतले आशीर्वाद


परळी । दिनांक  ०५ ।

राजकारण आणि समाजकारणात काम करत असताना एखादी व्यक्ती कितीही मोठया उंचीवर पोहोचली तरी शाळेत शिकविणाऱ्या गुरूजनांना कधीही विसरत नाही, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे देखील याला अपवाद नाहीत. आज शिक्षकदिनी त्यांनी आपल्या गुरूंना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेत खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा केला.

    ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा झाला. आजच्या दिवसाचे औचित्य साधत त्यांनी दुपारी शहरातील ज्या सरस्वती विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले, त्या शाळेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री नानासाहेब कवडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला व आशीर्वाद घेतले. यावेळी कवडे गुरूजींच्या पत्नी तसेच कुटुंबिय उपस्थित होते.दरम्यान, माझ्या शालेय जीवनातील गुरु हे कवडे गुरुजी असून राजकीय गुरू हे मुंडे साहेब आहेत, आमच्या जडणघडणीत त्यांचे योगदान महत्वाचे आहे, त्यांना वंदन करण्यासाठी मी आले अशा  भावना यावेळी पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या.


बॅक कॉलनीत शिक्षकांने साकारला मंत्रमुग्ध करणारा देखावा

-------------

पंकजाताई मुंडे यांनी आजच्या दिनाचे औचित्य साधून बॅक कॉलनीतील व्यंकटराव आदोडे या शिक्षकाच्या घरी जाऊन महालक्ष्मी व गणपती समोरील देखाव्याची पाहणी केली. आदोडे यांच्या कुटुंबात बहुतांश शिक्षक आहेत. शेतीपासून ते अंतराळापर्यंत अशा विविध क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा मंत्रमुग्ध करणारा देखावा त्यांनी साकार केला. हा अप्रतिम देखावा व त्याचे सुंदर अशा  सादरीकरणाचे पंकजाताईंनी कौतुक केले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार