इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-कलाश्री आयोजित फॅशन शो स्पर्धेत कु.हार्मीका जगतकर नंबर वन

 कलाश्री आयोजित फॅशन शो स्पर्धेत कु.हार्मीका जगतकर नंबर वन







बीड(प्रतिनिधी)  कलाश्री आयोजित गरबा दांडिया महोत्सव व फॅशन शो स्पर्धेचे आयोजन कैलास शिंदे,अपेक्षा शिंदे यांनी दिनांक २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता बीड शहरातील रामकृष्ण लॉन्स येथे केले होते.या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणून झी मराठी या वाहिनीवरील देवमाणूस या मालिकेतील नाईका अस्मिता देशमुख उर्फ डिंपल या होत्या तर स्टार प्रवाह या वाहिनीवरील एक टप्पा हाऊस कॉमेडी फेम अँकर बालाजी सुळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

कलाश्री आयोजित गरबा दांडिया महोत्सव व फॅशन शो स्पर्धे मध्ये मोठ्या गटातून तुलसी इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थिनी कु.हार्मीका बालाजी जगतकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.यावेळी मान्यवरांच्या हस्ते हार्मीकाला सात हजार रुपयांचा चेक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र डिझाईन गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले. तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीडची विद्यार्थिनी अन्विता राक्षे हिला मोठ्या गटातून तृतीय पारितोषिक मिळाले आहे. तर प्रीती शिंदेला चौथे आणि ऋतुजा आजबेला पाचवे पारितोषिक मिळाले आहे. तुलसी शैक्षणिक समूहातील विद्यार्थिनींनी या फॅशन शो स्पर्धेत आपल्या कलागुणांना सादर करत टॉप फाईव्ह येण्याचा मान मिळवला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे, तुलसी महिला मंडळ बीडच्या अध्यक्षा दीपाताई रोडे,प्राचार्य उमा जगतकर, प्राचार्य अश्विनी बेद्रे यांनी विजेत्या स्पर्धकांना त्यांनी मिळवलेल्या यशा बद्दल शुभेच्छा दिल्या आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!