MB NEWS-पोषण आहार जनजागृती प्रदर्शन व कार्यक्रमाचे आयोजन

 प्रत्येक व्यक्तीला पोषक आणि पुरक आहार आवश्यक-वैद्यकीय अधिक्षक डॉ अरुण गुट्टे



आजच्या धकाधकीच्या जीवनात फास्टफूड पेक्षा पोषक आहार प्रत्येक व्यक्तीला आवश्यक...प्रा.प्रविण फुटके


आई, सुदृढ तर जन्माला येणारे बाळ सुदृढ म्हणून आईने पोषक आहार घ्यावा.... आहारतज्ञ सुलक्षणा पाटील 



परळी वैजनाथ दि.२३ (प्रतिनिधी)

              प्रत्येक व्यक्तीला पोषक आणि पुरक आहार आवश्यक आहे असे वैद्यकीय अधिक्षक डॉ अरुण गुट्टे यांनी सांगितले, आजच्या धकाधकीच्या जीवनात फास्टफूड पेक्षा पोषक आहार प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असल्याचे मत प्रा.प्रविण फुटके यांनी व्यक्त केले तर आई, सुदृढ तर जन्माला येणारे बाळ सुदृढ म्हणून आईने पोषक आहार घ्यावा असे आहार तज्ञ सुलक्षणा पाटील यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात पोषण आहार महिन्या निमित्त पोषण आहार जनजागृती प्रदर्शन व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

               येथील उपजिल्हा रुग्णालयात पोषण   आहार महिन्या निमित्त पोषण आहार संदर्भात माहितीचे प्रदर्शन व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अरुण गुट्टे, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.प्रविण फुटके, सहाय्यक अधिक्षक रामधन कराड उपस्थित होते. प्रदर्शनाचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अरुण गुट्टे यांच्या हस्ते फित कापून धनवंतरी देवीच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना आहार तज्ञ सुलक्षणा पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की, महिलांनी अगोदर स्वतःसुदृढ बनल्यानंतरच आई बनले पाहिजे, कारण स्वतः सुदृढ नसाल तर जन्माला येणारे बाळ सुदृढ बनत नाही. यासाठी महिलांनी चांगला आहार घेतला पाहिजे तर प्रा.फुटके यांनी सांगितले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने प्रथम आपल्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषतः महिलांनी स्वतःच्या आहाराकडे लक्ष दिल्यास संपूर्ण कुटुंब सुदृढ बनते. तर अध्यक्षीय समारोपात डॉ गुट्टे यांनी सांगितले की, व्यक्तीने आपल्या आहारात योग्य प्रथिनांचा समावेश केला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,आभार सुलक्षणा पाटील यांनी मानले. कार्यक्रमास 

सहाय्यक अधिक्षक रामधन कराड,सहाय्यक अधिसेविका श्रीमती गायकवाड, श्रीमती निता मूगले, श्रीमती टाकळकर ,श्रीमती जगतकर, श्रीमती कुलकर्णी, श्रीमती आंधळे, शरद चव्हाण, वसीम शेख, श्री वरवटकर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !