MB NEWS- चि. विरेंद्रसिंह माने यांचे जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेमध्ये घवघवीत यश :माऊली संगितालयाच्या वतीने सत्कार

चि. विरेंद्रसिंह माने यांचे जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेमध्ये घवघवीत यश :माऊली संगितालयाच्या वतीने सत्कार 

माऊली संगित विद्यालयात अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने भव्य सत्कार"

परळी (प्रतिनिधी )- शहरातील बारावीचा विद्यार्थी विरेंद्रसिंह माने यांनी जेईई परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून परळीचे नावलौकिक भारतात केले आहे. या यशाबद्दल अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे यांनी शाल श्रीफळ फेटाबाधुन पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन बीड जिल्हा नियोजन समिती सदस्य वैजनाथराव सोळंके,उपनगराध्यक्ष रविंद्र परदेशी,सुजयसिंह माने, सुरेश मोगरे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.जेईई मुख्य २०२२ परीक्षेमध्ये तब्बल नऊ लाख परीक्षार्थी बसलेले होते. तर दोन सेक्शनमध्ये अठरा लाखांचा अटेम्प्ट झाला. त्यातून चि. वीरेंद्रसिंह माने यांनी ३९६३वा देशात क्रमांक मिळवला व जेईई ॲडव्हान्स २०२२ साठी प्रवेश मिळवला  . 


    जेईई मुख्य २०२२ परीक्षेमध्ये तब्बल अडीच लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते .अडीच लाख परीक्षार्थीमध्ये चिरंजीव वीरेंद्रसिंह माने यांनी जेईई ॲडव्हान्स २०२२ मध्ये  देशात २२१९ वा क्रमांक पटवून पटकावून परळीचा नावलौकिक उंचावला आहे. याचबरोबर चिरंजीव वीरेंद्रसिंह माने हा बारावीची परीक्षा  ९२.६ % घेऊन उत्तीर्ण झाला आहे . 


  चि. विरेंद्रसिंह माने हा भेल सेकंडरी स्कूलचा विद्यार्थी असून, त्याने दहावीमध्ये ९६.७% मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला होता.चि .विरेद्रसिंह माने हा श्री सुजयसिंह माने (अतिरिक्त कार्यकारी अभियंता ) थर्मल पॉवर स्टेशन,  परळी वैजनाथ यांचा द्वितीय चिरंजीव असून, त्याचा प्रथम चिरंजीव दिग्विजयसिंह माने हासुद्धा  BITS PILANI मधून 2022 यावर्षी घेऊन अमेझॉन या कंपनीमध्ये रुजू झाला आहे . 


चिरंजीव वीरेंद्रसिंह माने हा डॉ. नारायणराव देशमुख यांचा नातु आसुन त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे श्री सुजयसिंह माने यांनी सर्वांचे मन पूर्वक आभार व्यक्त केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार