उजळल्या हजारो ज्योती....! श्रीकृष्ण मंदिरात दिवाळी पाडव्यानिमित्त दीपोत्सव

 उजळल्या हजारो ज्योती....!

श्रीकृष्ण मंदिरात दिवाळी पाडव्यानिमित्त दीपोत्सव


परळी / प्रतिनिध

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी  असं म्हणत उत्साहात दिवाळी साजरी होत असतांनाच परळी वैजनाथ येथील श्रीकृष्ण मंदिरात १ हजार १ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. 

     भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वताची पूजा केली तो आजचाच दिवस त्यामुळे गवळी समाजात या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे. यामुळेच येथील श्रीकृष्ण मंदिरात पाडव्याच्या सायंकाळी हजारो दिवे एकमेकांना जोडत दीपोत्सवाची सुंदर आरास मांडण्यात आली होती या ज्योतीच्या प्रकाशातील भगवान श्रीकृष्णाचे सुंदर, गोजीरे रूप आपल्या डोळ्यांत साठवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

● हे देखील वाचा:अंत्यसंस्काराला नेतानाच तिरडीवर तो बसला उठून

     दिव्यांचा सण असलेल्या दिवाळीत राकेश जाधव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात माजी नगरसेवक वैजनाथ बागवाले, पत्रकार प्रा.रवींद्र जोशी, संभाजी मुंडे, प्रथमेश भास्कर, नितीन भाकरे, निलेश जाधव, संभाजी काळे, प्रा.किशोर पवार, दशरथ गायकवाड, दया स्वामी, सौ. दीपा बागवाले, कु. सुरुची भास्कर, कु. श्रेया जाधव आदी  सहभागी झाले होते.

Video News 



    सायंकाळच्या शांततेत मावळतीला निघालेला सूर्य व अमावस्ये नंतर निघणारा चंद्र, झोंबणारा थंड वारा आणि परिसरात रेखाटलेल्या रांगोळ्या एका उत्सवासाठी सज्ज होत्या. सायंकाळी ६  वाजता मेणबत्त्या प्रज्वल‌ित झाल्या. मंदिर व परिसरात एका रेषेत लावलेल्या पणत्या मेणबत्तीने प्रज्वल‌ित होऊ लागल्या. पणत्यांच्या उभ्या,आडव्या रेषा एकमेकांत गुंफल्या गेल्या आणि श्रीकृष्ण मंदिर हजारो ज्योतीने  उजळून निघाले. दीपोत्सवाने श्रीकृष्ण मंदिराला चढलेला साज पाहण्यासाठी सायंकाळी परळीकरांनी मोठी गर्दी केली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार