MB NEWS-पुराच्या पाण्यात 25 वर्षीय युवकाचा मृत्यू: मृतदेह शोधून काढण्यात यश

 पुराच्या पाण्यात 25 वर्षीय युवकाचा मृत्यू: मृतदेह शोधून काढण्यात यश

परळी शहर व तालुक्यात गुरुवार दि 20 रोजी रात्रीच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावत अक्षरशः दाणादान उडविली. विजेच्या कडकडाटासह अनेक तास धुंवादार पाऊस झाल्याने शहर व तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले.परळी तालुक्यातील गाढे पीपळगाव येथील अक्षय विक्रम आरगडे हा 25 वर्षीय युवक नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला असून परळी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर  व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्परता दाखवीत शोध कार्य सुरू केले.वाहून गेलेल्या अक्षय आरगडे याचा मृत देह आढळून आला आहे.सध्या अनेक ठिकाणी नदी,ओढे याला पूर आला असून यातुन कोणीही प्रवास करण्याचे धाडस करू नये असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

● संबंधित व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा......
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !