MB NEWS-खोटा धनादेशदिला ;आरोपीस 3 महिने तुरुंगावास व दंड !

 खोटा धनादेश दिला ;आरोपीस 3 महिने तुरुंगावास व दंड !

अॅड.आर.व्ही गित्ते नंदागौळकर


परळी वैजनाथ :

सिरसाळा येथील ज्ञानेश्वर पतसंस्थेला खोटा धनादेश दिल्याच्या आरोपावरून सोनपेठ न्यायालयाने आरोपीस तीन महिने तुरूंगवास व रू 58 000 दंडाची शिक्षा ठोठावली आहे. एका महिन्यात दंडाची रक्कम रु 58000 नुकसानभरपाई म्हणून फिर्यादी पतसंस्थेला देण्याचा आदेश दिला आहे.*  

      सिरसाळा येथील ज्ञानेश्वर पतसंस्थेकडुन आरोपी नामदेव दगडू सलगर रा.मुंगी यांनी वैयक्तीक कर्ज रू  30 000 घेतले होते.सदर कर्जाच्या थकित रक्कमेची वेळोवेळी मागणी केली असता नामदेव दगडू सलगर यांनी दिनांक 05.10.20छ15 रोजीचा दि अंबाजोगाई पिपल्स को आप बँक लि.अंबाजोगाई शाखा सिरसाळा या बँकेचा चा रू. 58 000 चा धनादेश दिला होता.सदर धनादेश न वटल्यामुळे ज्ञानेश्वर पतसंस्थेमार्फत बालाजी अप्पाराव भोयटे यांनी सुरवातीला परळी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती परंतु मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदर केस सोनपेठ न्यायालयात वर्ग करण्यात आली होती.सदर प्रकरणात साक्षीपुरावा होऊन आरोपीस उपरोक्त शिक्षा ठोठावली होती व आरोपीने एका महिन्यात दंड नाही भरल्यास आणखी एक महिना तुरुंगावास भोगावा लागणार आहे.ज्ञानेश्वर पतसंस्थेच्या वतीने अँड.आर.व्ही.गित्ते नंदागौळकर व अँड माधव चिमनगुंडे सोनपेठकर यांनी  यांनी काम पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार