MB NEWS-शेतकऱ्यांना त्वरित हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊन सरसकट विमा लागू करावा— प्रा.टी.पी.मुंडे

 शेतकऱ्यांना त्वरित हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊन  सरसकट  विमा लागू करावा— प्रा.टी.पी.मुंडे



 मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे  मागणी!


परळी वैजनाथ प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात आणि परळी तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः रुद्र रूप धारण केले असून शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला. संपूर्ण पीक शेतकऱ्याचे नष्ट झाले शासनाने प्रती हेक्टरी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊन सरसकट पिक विमा लागू करावा तसेच तलाठी यांच्यामार्फत सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी  प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे. 


   सध्या सुगीचे दिवस असून शेतकऱ्यांना मात्र आसमानी संकटाचा सामना करावा लागत आहे. आपल्या पोटच्या पोराप्रमाणे काढणीला आलेले पीक परतीच्या पावसाच्या पाण्यामुळे नष्ट झाले त्यामुळे शेतकरी हातबल झाला असून त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ऑक्टोबर महिन्यापासूनच परतीच्या पावसाने रुद्र रूप धारण केले असून शेतकऱ्याचे पीक पाण्यात गेले आहे.


    काढणीला आलेले सोयाबीन, ज्वारी, कापूस, बाजरी येथे पाण्यात भिजून गेले असून पिकाचे दाणे संपूर्ण नष्ट झाले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे त्यामुळे त्याला कोणतेही पीक काढता येत नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे त्यामुळे त्याला धीर देणे आवश्यक आहे. पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना वेगवेगळे निकष व अटी लावत असून ते संपूर्ण न लावता शासनाने आणि प्रशासनाने गावातील त्यांचे प्रतिनिधी तलाठी यांना प्रत्येक गावात जाऊन पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा लागू करून प्रती हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊन त्याची दिवाळी गोड करावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली असून या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार