MB NEWS-विदारक परिस्थितीत पंचनामे न करता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्‍टरी 50 हजाराची मदत द्या - संभाजी ब्रिगेड

विदारक परिस्थितीत पंचनामे न करता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी  हेक्‍टरी 50 हजाराची मदत द्या - संभाजी ब्रिगेड 

परळी (प्रतिनिधी)

तालुक्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे कुठलाही भेदभाव न करता कुठलेही निकष न लावता सरसकट परळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केले आहे.

 मागच्या काही दिवसापासून पावसानं रुद्ररूप धारण केलं असून परळी तालुक्यामध्ये शेतकरी सोयाबीन काढणीसाठी कापूस वेचणीसाठी कामाला लागले असताना अचानक पावसाने खूप मोठ्या प्रमाणात हैदोस घातला आहे परळी तालुक्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये व काल खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सोयाबीन शंभर टक्के गेलं आहे एक तर पाण्यात वाहून गेले आहे किंवा सोयाबीन मध्ये पाणी साचले आहे अनेकांचे सोयाबीन काढून ढिग तयार केलेले सुद्धा पावसाच्या पुरामध्ये वाहून गेले आहेत सध्या दिवाळीचा सण तोंडावर असताना शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार असून कुठल्याही पद्धतीचे नियम निकस न लावता पंचनामे न करता शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50 हजाराची मदत द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.


● संबंधित व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा......

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार