MB NEWS- *परळीत भिमनगर येथे 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा*

 *परळीत भिमनगर येथे 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा*

परळी / प्रतिनिधी - 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दि 5 ऑक्टोबर 2022 रोजी परळी वैजनाथ येथील भिमनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात व सुंगधकुटी बुद्ध विहार अशा दोन्ही ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन सकाळी 9 ते11 या वेळेत विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


सकाळी ठिक 9:00 वाजता भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना सर्व उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांनी सामुदायिक  पुष्पहार घालून आभिवादन केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात  सामाजिक कार्यकर्ते आयु नवनाथ दाणे तर सुंगध कुटी बुद्ध विहारात आयु अनिता विलास रोडे यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले, त्यानंतर सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली, तदनंतर 22 प्रतिज्ञांचे प्रकट वाचन करण्यात आले. याप्रसंगी 11 तोफांची सलामी देण्यात आली व ढोल ताशा च्या सोबत घेऊन फळ वाटप करण्यात आले.


 या प्रसंगी शेकडो बौद्ध उपासक उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यकमात प्रा विलास रोडे, भारत ताटे, डॉ. सिद्धार्थ जगतकर, वैजनाथ( तात्या) जगतकर, एच टी वाघमारे, सोपानराव रोडे,अशोक तरकसे, रामभाऊ गोखले, वसंत बनसोडे, संदीप ताटे,प्रकाश भाऊ जगतकर, एस के ताटे, सुंदरराव वैद्य, मिलिंद बनसोडे, राजाभाऊ जगतकर, अमर रोडे, मुकुंद ताटे, दिपक सिरसाट , गवळण बाई गोखले, संघमित्रा ताटे मॅडम, संध्यामॅडम ,आशा रोडे- वाघमारे, इ सह अनेक जण उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !