MB NEWS-77 वर्षीय शेतकऱ्याने सांगितले आपल्या आयुष्यात एवढा पाऊस बघितला नाही

 विदारक परिस्थिती: गेल्यावर्षीचं 100 अन् यंदाचे कट्टे150 कट्टे सोयाबीन पाण्यात ;कोंबड्या मेल्या:अख्या घरात पाणीच पाणी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी ....
     परतीच्या पावसाने हाकार मांडला असून शेती शेतीतील पिके रानातले घर पाळलेले पशु या सर्वच घटकांवर या पावसाने वरवंटा फिरविण्याची चित्र निर्माण झाले आहे काल परळी तालुक्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घालत उरलंसुरलं सर्व खतम करून टाकला आहे अशा परिस्थितीत प्रत्येक शेतकरी आपापली व्यथा मांडताना दिसत आहे यातच बेलंबा येथील वय वर्ष 77 असलेल्या एका शेतकऱ्याने सांगितले की आपल्या आयुष्यात आपण एवढा पाऊस पाहिलेला नाही रानातील घर जमिनीपासून तीन फूट उंचावर बांधलेले आहे या घरात असलेले गेल्या वर्षीचे व यावर्षीचे सगळे सोयाबीन पाण्यात गेले आखाड्यावर असलेल्या पाळलेल्या कोंबड्या मेल्या सगळ्या घरात पाणीच पाणी झालं अशा परिस्थितीत नेमकं करावं काय असा खिन्न प्रश्न या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.

        प्रभू धर्म गिरी रा.बेलंबा यांचे घरात कालच्या पावसाचे पाणी घुसल्याने यावर्षी झालेले 150 कट्टे सोयाबीन व मागच्या वर्षीचे 100 कट्टे सोयाबीन घरातच होते. ते सर्व पाण्यात भिजलेले आहे. शेतात 3 फूट उंच घर असूनही घरात पाणी घुसल्याने हे नुकसान झाले असून त्यांच्या घरी पाळलेल्या कोंबड्याही मरण पावल्या आहेत.गिरी यांचे वय 77 असून त्यांनी आयुष्यात याआधी असा पाऊस पहिला नाही असे सांगितले आहे.तसेच रानातील सर्व पीकही खराब झाले आहे.


● संबंधित व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा......

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !