इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-बाळासाहेबांची शिवसेना: ढाल तलवार नव्या चिन्हाचे परळीत जोरदार स्वागत

 बाळासाहेबांची शिवसेना: ढाल तलवार नव्या चिन्हाचे परळीत जोरदार स्वागत



परळी वै:-प्रतिनिधी....

      निवडणुक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना गटाला ढाल तलवार चिन्ह अधिकृत दिल्याने परळीत ढोल ताशे,फटाके फोडुन व पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा केला.

बाळासाहेबांची शिवसेनेच्या नेते पदाधिकारी व कार्यकर्ते परळी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राणी लक्ष्मीबाई टावर येथे एकञीत येऊन एकनाथ शिंदे साहेब आगे बढो हम आपके साथ है...,जय भवानी,जय शिवराय,बाळासाहेबांची शिवसेना यांच्या घोषणा देत  परिसर दणाणुन सोडला होता.


  याप्रसंगी, बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुका प्रमुख, शिवाजी शिंदे,उपजिल्हा प्रमुख अँड रामराव माने,धनंजय गित्ते,महिला तालुका प्रमुख यशोदा राठोड,तालुका सचिव विश्वनाथ  राठोड,उपतालुका प्रमुख सुंदर रावळे, विष्णू ढेबरे उपशहर प्रमुख सिरसाळा,अँड संजय डीघोळे,सचिन स्वामी बालासाहेब देशमुख, वैजनाथ माने,युवा सेना शहर प्रमुख गजानन कोकीळ,संजय कदम,नवनाथ सरवदे,गजानन कदम,सचिन बुंदुले,रमेध लोखंडे, विठ्ठल गायकवाड,महेश जुनाळ,सुरेश बिडगर, कृष्णा सरवदे,गजानन राठोड,अंकुश राठोड,यासह बाळासाहेबाची शिवसेनेचे असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!