MB NEWS-त्रिपुराचे नगरविकास सचिव किरण गित्ते यांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार

 त्रिपुराचे नगरविकास सचिव किरण गित्ते यांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार 




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत संपुर्ण देशात छोट्या राज्यामध्ये त्रिपुरा ने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल राष्ट्रपतीच्या हस्ते त्रिपुराचे नगरविकास सचिव किरण गित्ते यांना पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. 


   शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे रविवार, दि.9 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत संपुर्ण देशात छोट्या राज्यामध्ये त्रिपुरा ने पहिला क्रमांक पटकावला आहे. दिल्ली येथील आयोजीत समारंभात राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते त्रिपुराचे नगरविकास सचिव किरण गित्ते यांना नुकताच पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री आ. धनंजय मुंडे अध्यक्ष नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने किरण गित्ते यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीपजी खाडे, यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल दुबे, मिलिंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य कोमावर सर , शारदा विद्या मंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक लोणीकर सर,शारदाबाई गुरुलिंगअप्पा मेनकुदळे विद्यालयाचे मुख्याध्यापक साखरे सर,मिलिंद विद्यालयाचे पर्यवेक्षक धायगुडे सर यांच्या सह  शिक्षक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार