MB NEWS-तेली समाज दांडीया समितीचे यशस्वी आयोजन

 महिलांनी स्वाभीमानाने जगण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे -अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर



तेली समाज दांडीया समितीचे  यशस्वी आयोजन

परळी वैजनाथ दिली.०५ (प्रतिनिधी)

           महिलांनी स्वाभीमानाने जगण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे असल्याचे मत अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी व्यक्त केले. त्या तेली समाज आयोजित दांडीया महोत्सवाच्या समारोपात बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होत्या. 

             येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनी मंदिराच्या सभागृहात तेली समाज दांडीया उत्सव समितीच्या वतीने यंदा प्रथमच दांडीया उत्सवाचे आयोजिन करण्यात आले होते. दांडीया उत्सवात आठ दिवस वेगवेगळ्या थिमच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर पोलीस  निरीक्षक उमाशंकर कस्तुरे व शनी मंदिर देवस्थान कमिटीचे विश्वस्त राजाभाऊ शिंदे, श्री.शनैश्चर निधी अर्बन लिमिटेडचे चेअरमन वैजनाथ बेंडें ,तेली समाज दांडीया उत्सव समितीचे अध्यक्ष पवन फुटके उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे व कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करुन आरती घेण्यात आली. दांडीयाचे सादरीकरण झाल्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले.पुढे बोलताना श्रीमती नेरकर म्हणाल्या की, महिलांची नऊ रुपे आहेत, या नऊ रुपात पुजा केली जाते. पण ही शक्तीचीही रुपे आहेत. महिलांनी या रुपात आपले जिवन स्वाभीमानाने जगण्यासाठी तयार केले पाहिजे. आपण सरस्वती आहात तर तुमचे शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे. तर लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी स्वतः पायावर उभे राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कविता नेरकर यांनी केले. 

Video:


महिलांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे फार गरजेचे आहे. ते आयोजकांनी दिले. हे महत्त्वाचे आहे. असे म्हणत या दांडीया आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर फुटके व सुजाता फुटके यांनी केले.यावेळी शनी मंदिर कमिटीचे चंद्रकांत उदगीरकर, महारुद्र उदगीरकर, शनैश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवशंकर जठार, महाराष्ट्र प्रांतिकचे नागनाथ भाग्यवंत, तेली युवक संघटनेचे ईश्वर राऊत, महाराष्ट्र प्रांतिकच्या जिल्हाध्यक्षा राधाताई फकिरे यांच्यासह तेली समाज दांडीया उत्सव समितीचे अध्यक्ष पवन फुटके ,अतुल बेंडे, राजकुमार भाग्यवंत, सोमनाथ वाघमारे, अशोक रोकडे, रवी अन्नपूर्णे, सचिन लासे, शंकर कौले सर्व समितीचे सदस्य, शनैश्वर महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयोजकांच्या वतीने सर्व सहक्षागींसह विविध स्पर्धेत जवळपास 200 बक्षिसे देण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !